मिरज - लोंढा रेल्वे मार्गावर 'या' रेल्वे गाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

कर्नाटक मधील रेल्वेमार्गाचे दुहेरी आणि विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या पूर्ण विस्कळीत झाली आहे. मिरज ते ते बेळगाव, मिरज ते लोंढा , मिरज ते हुबळी या सर्व पॅसेंजर गाड्या  आज (मंगळवार)  आणि उद्या बुधवार ( ता.11)  रोजी बंद राहणार आहेत.

मिरज ( सांगली ) - मिरज ते लोंढा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत तर तिरुपती ते कोल्हापूर आणि हैदराबाद कोल्हापूर या दोन गाड्या पंढरपूर सोलापुर गदगमार्गे वळविण्यात आल्या आहेत. याशिवाय हुबळी ते मुंबई धावणारी गाडी आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) पर्यंत रद्द करण्यात आली आहे तर बुधवार ( ता.11 ) आणि गुरुवार (ता.12) डिसेंबर रोजी मुंबईहून हुबळी कडे येणारी हीच गाडी  रद्द करण्यात आली आहे.

कर्नाटक मधील रेल्वेमार्गाचे दुहेरी आणि विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या पूर्ण विस्कळीत झाली आहे. मिरज ते ते बेळगाव, मिरज ते लोंढा , मिरज ते हुबळी या सर्व पॅसेंजर गाड्या  आज (मंगळवार)  आणि उद्या बुधवार ( ता.11)  रोजी बंद राहणार आहेत. मिरज ते कॅसलरॉक दरम्यानची  गाडीही 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहे.

हेही वाचा - अबब ! मटक्‍यातून जमवली एक हजार कोटींची प्रॉपर्टी

हरिप्रिया एक्स्प्रेस, हैदराबाद रेल्वे मार्गात बदल

याशिवाय कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आणि कोल्हापूर हैदराबाद या दोन्ही गाड्या आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) पर्यंत पंढरपूर - कुर्डुवाडी सोलापूर गदग मार्गे धावणार आहेत. यापैकीच कोल्हापूर तिरुपती ही गाडी दररोज तीन ते चार तास उशिरा धावत असल्याने त्याचा परिणाम कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस या गाडीच्या वेळापत्रकावर झाला आहे. ही गाडीही ही तीन ते चार तास उशिरा धावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trains On Miraj Londa Cancelled Due To Renovation Work