esakal | कमी किमतीत दुचाकी घेताय मग ही बातमी वाचाच 

बोलून बातमी शोधा

two arrested with theft two wheeler in belgaum

हिरेबागेवाडी पोलिसांचे गुडमॉर्गिंक बीट पथक हिरेबागेवाडी येथे गस्तीवर होते. त्यावेळी बैलहोंगलकडून विना नंबर प्लेट असलेल्या लाल आणि काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येणाऱ्या संशयिताला पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे कागदत्रांची विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यात नेउन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी एपीएमसी यार्डमधून चोरल्याची कबुली दिली.

कमी किमतीत दुचाकी घेताय मग ही बातमी वाचाच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकींची चोरी करुन त्या कमी किमतीत विक्री करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आझाद मेहबुबसुबाणी किल्लेदार (वय 26, रा. तिगडी ता. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. 

हे पण वाचा - शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेवून फिरण्यासाठी सात जन्म लागतील 

बुधवार (ता.4) सकाळी 7 च्या सुमारास हिरेबागेवाडी पोलिसांचे गुडमॉर्गिंक बीट पथक हिरेबागेवाडी येथे गस्तीवर होते. त्यावेळी बैलहोंगलकडून विना नंबर प्लेट असलेल्या लाल आणि काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येणाऱ्या संशयिताला पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे कागदत्रांची विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यात नेउन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी एपीएमसी यार्डमधून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून विना नंबरप्लेटच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. गुरुवार (ता.5) न्यायालयाच्या परवानीनुसार पोलीस कोठडीत घेउन पुन्हा चौकशी केली असता त्याच्याकडून आनखी सात दुचाकी अशा एकून साडेचार लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या. वरील संशयित चोरीच्या मोटार सायकल कमी दरात विक्री करीत होता. त्याने बेळगाव शहर, कित्तुर आणि बैलहोंगल येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने सदर चोरीच्या मोटार सायकली हन्नीगेरी गावातील रुद्रप्पा तिप्पण्णा नंदी, रुद्राप्पा यल्लाप्पा उद्दण्णवर, सिध्दाप्पा फकिरप्पा यरगुद्दी आणि निलाप्पा बसवनेप्पा चोळद यांना कमी किमतीत विक्री करीत होता. सदर दुचाकी चोरीच्या असल्याचे माहित असून देखील त्या खेरीद केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

हे पण वाचा - कोल्हापूर विमानतळावर कोरोना वायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना... 

पोलीस निरीक्षक एन. एन. अंबीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.