सासरच्या जाचाला कंटाळून दोन मुलींसह विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन माहेरी संपवलं जीवन

आठ महिन्यांपूर्वी पतीच्या घरच्यांना कंटाळून सरस्वती माहेरी आली होती.
crime news
crime newssakal
Summary

रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथील सरस्वती हिचा विवाह सांगली येथील नितीन किरवे यांच्याशी २०१६ मध्ये झाला होता.

रायबाग : दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन मातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १७) रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथे उघडकीस आली. सरस्वती नितीन किरवे (वय २६), दीपिका (वय ७) आणि रितिका (वय ४, सर्व रा. शंभर फुटी रोड, सांगली (महाराष्ट्र) अशी मृतांची नावे आहेत. हारूगेरी पोलिस ठाण्यात (Harugeri Police Station) या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत माहिती अशी, रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथील सरस्वती हिचा विवाह सांगली येथील नितीन किरवे यांच्याशी २०१६ मध्ये झाला होता. या दोघांना दोन मुली होत्या. आठ महिन्यांपूर्वी पतीच्या घरच्यांना कंटाळून सरस्वती माहेरी आली होती. याकाळात ती दोन मुलींचा सांभाळ करत होती.

crime news
Indian Army : कर्तव्य बजावताना भारतीय जवानाचा मृत्यू; बिऊर गावात तेजस मोरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मात्र, विवंचनेतून तिने बुधवारी दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. सध्या सरस्वती आपल्या आईच्या घरी राहत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई व भावांसह आठ महिन्यांपासून ती राहत होती. माझी जबाबदारी आई व भावांवर येत असल्याच्या विवंचनेतून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

crime news
सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत; कागल परिसरात हळहळ, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

सासर सांगली येथील असून त्रासामुळे ती सुलतानपूर (ता. रायबाग) येथे राहण्यास आली होती. तिने येथे आत्महत्या केली असली तरी तिच्या सासरच्या लोकांविरूद्ध कोणीही तक्रार दिली नसल्याने त्याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हारूगेरी पोलिस ठाण्याचे मंडल पोलिस निरीक्षक रविचंद्रन, सहकारी एस. बी. बेक्केरी, एच. आर. अंबी, पी. पी. दोडमनी यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com