सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी 'ते' दोघे करायचे घरफोडी! 

सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी 'ते' दोघे करायचे घरफोडी! 

सोलापूर : विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलासह चोरट्याला अटक केली आहे. ज्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी पाहणी करून त्यानंतर चोरी करायचे, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून 17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा : हळव्या विद्यार्थ्यांची द्रवली मने, दिली अशी मायेची ऊब! 

बाल वयापासून गुन्हेगारी क्षेत्रात 
आकाश महादेव उडानशिवे (वय 21, रा. देवनगर, सोरेगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. आकाश आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने गेल्या काही दिवसांत तीन ठिकाणी घरफोडी केली होती. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन सोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्पमधील राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस कर्मचारी अंकुश मोरे, प्रतापनगर येथील परेश नशेरीकर, सोरेगाव येथील श्रीकांत दावणकर यांच्या घरी झालेली चोरी उघडकीस आणली आहे. दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. आकाश हा हॉटेलमध्ये काम करतो. तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. तो अल्पवयीन असताना बालगुन्हेगार म्हणून त्याची बाल सुधारगृहात रवानगी झाली होती. गेली दोन वर्षे तो शांत होता. आता पुन्हा चोरीच्या घटनांकडे तो वळाला आहे.

हेही वाचा : ओ सर...भीक मागत नाही, काम मागतोय..!

पोलिसांनी जप्त केले 17 तोळे सोने
अल्पवयीन मित्राच्या मदतीने ज्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणीच चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून 17 तोळे सोन्याचे दागिने अशा एकूण पाच लाख 15 हजार रुपयांच्या मुद्देमालासह घरफोडीसाठी लागणारे हत्यार हस्तगत केले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहा. पोलिस आयुक्त प्रीती टिपरे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलिस कर्मचारी संजय मोरे, दिलीप भालशंकर, राजकुमार तोळणुरे, प्रकाश निकम, अनिल गवसाणे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com