पंढरपूर : मित्राला वाचवण्यासाठी मारली उडी अन् दोघेही गेले वाहून!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

भीमा नदीपात्रातून सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

पंढरपूर : उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविल्याने भीमा नदीने धोक्याची पाळी ओलांडली आहे. अशातच आज (रविवार) गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील दोन तरूण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

स्वप्नील शिंदे (वय18) आणि लक्ष्मण खंकाळ (वय 19) अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास गुरसाळे बंधाऱ्याजवळ घडली. गेल्या दोन दिवसांपासून भीमानदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.

- चंद्रकांतदादा है, तो मुमकिन है !; यांनी उधळली स्तुतीसुमने

भीमा नदीपात्रातून सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दोघे तरूण येथील नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. एकाने बंधाऱ्यावरून उडी मारली. पाण्याच्या वेगाच्या प्रवाहाबरोबर वाहत जात असताना दुसऱ्याने त्याला वाचवण्यासाठी उडी मारली असता दोघेही वाहून गेले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

वाहून गेलेल्या तरूणांचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी प्रयत्न करत आहेत.

- जेव्हा दाऊदने केला होता राम जेठमलानींना फोन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths were flown into the Bhima river