राज्यसभा की लोकसभा? उदयनराजेंचं ठरलंय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून उदयनराजे पुन्हा निवडणूक लढणार की राज्यसभेवर जाणार या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं आहे. ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा : भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून उदयनराजे पुन्हा निवडणूक लढणार की राज्यसभेवर जाणार या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं आहे. ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा : राष्ट्रवादी देणार उदयनराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार; 'या' नावाची चर्चा 

उदयनराजे भोसले यांचे शनिवारी रात्री साताऱ्यात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलत असताना उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षात झालेली घुसमट बोलून दाखवली. या वेळी बोलत असताना ते म्हणाले, माझ्या मनाला जे वाटलं बुद्धीला जे पटलं ते मी केलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा : उदयनराजेंनी मारल्या टेबलवर बुक्या

राज्यसभेवर जाताय की लोकसभेवर असे माध्यमातून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते मिश्कीलपणे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे मला आताच तरुण म्हणाले आहेत. तुम्ही राज्यसभेवर पाठवून मला का म्हातारे करताय? यातून ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udaynraje Bhonsle decide about may contest satara loksabha by election