मच्छीमार म्हणताहेत, ''उजनी भरलं, पण मासा नाय जाळ्यामंदी!''

राजाराम माने
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवानंतर मांसाहाराकडे ओढा असताना त्याच्या दरांत मात्र विक्रमी वाढ झाल्याने मांसाहार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याचे चित्र आहे.​

केतूर (जि. सोलापूर) : गणेशोत्सवानंतर मांसाहारप्रेमींकडून माशांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच उजनी जलाशयाचा पाणीसाठा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढूनही मासेच सापडत नसल्याने माशांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे. उजनी जलाशयात शासनाने वेगवेगळ्या जातीचे मत्स्यबीज सोडावे, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. 

- Video : हॅलो ठाणे महापौर, डोंगरीमधून दाऊदचा माणूस बोलतोय!

यावर्षी उन्हाळ्यामध्ये उजनी जलाशयाचा पाणीसाठा उणे 59 टक्के एवढ्या नीचांकी पातळीवर पोचला होता. या वेळी जलाशयातील सर्व जातींचे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. सध्या उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असतानाही मासेच शिल्लक राहिले नसल्याने ते सापडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे केत्तूर (ता. करमाळा) येथील मच्छीमारांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

- पुणे : पोलिस म्हणतात, 'निवडणूक आहे, हिशोबात राहायचं'

गणेशोत्सवानंतर मांसाहाराकडे ओढा असताना त्याच्या दरांत मात्र विक्रमी वाढ झाल्याने मांसाहार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याचे चित्र आहे. माशांखेरीज चिकन-मटणासह गावरान व इंग्लिश अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, चिकनच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे, तर गावरान अंड्यांचे दर शेकडा 20 रुपये, तर इंग्लिश अंड्यांच्या दरांत शेकडा 30 ते 35 रुपयांनी वाढ झाली आहे. मटणाचे दर मात्र 480 ते 500 रुपये किलो अशाप्रकारे स्थिर आहेत. 

- विरोधकांना झटका; विधानसभा निवडणूक 'ईव्हीएम'वरच होणार​

भिगवण मच्छीमार्केटचे दर (प्रतिकिलो- रुपयांत) 
चिलापी (मोठी ) : 180 ते 200 
चिलापी (मध्यम) : 150 ते 160 
चिलापी (लहान) : 100 ते 120 
वाम : 450 ते 500 
काणस : 150 ते 180 
रोहू : 250 ते 280 
कटला : 250 ते 260 
गुगळी : 380 ते 400 
शिंगटा : 240ते 260 
चांभारी : 130 ते 150 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ujani reservoir fish have not been found but increased in fish price