पुणे : पोलिस म्हणतात, 'निवडणूक आहे, 'हिशोबात' राहायचं'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

- विधानसभा निवडणुकीत शहरात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावी यासाठी पोलिसांनीही सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले

पुणे : विधानसभा निवडणुकीत शहरात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावी यासाठी पोलिसांनीही सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आज अनेक गुन्हेगारांना बोलावून घेऊन त्यांना 'हिशोबात' रहा असे बजावले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अद्याप अचारसंहिता लागू झालेली नसली तरी राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार ठरवणे, मतदारांपर्यंत पोहोंचण्याचे नियोजन करणे याला गती आलेली आहे. तर प्रशासनही कामाला लागले आहे. निवडणुकीच्या काळात अनेक गुन्हेगार सक्रीय होतात. काही उमेदवार तर गुन्हेगारांना सोबत घेऊनच प्रचारात उतरत असतात. त्यामुळे या काळात मतदारांवर प्रभाव पडतोच पण कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे गुन्हे शाखेने पुण्यातील प्रमुख टोळ्यांमधील गुन्होगारांना व नव्याने गुन्हे दाखल झालेल्यांना खंडणी विभागाने आज हजेरीला बोलावले होते.

औरंगाबाद : तो बोलत होता दुसरीशी फोनवर, पत्नीने गुप्तांगावर चाकू खुपसून केला खून

या गुन्हेगारांचा जुना रेकॉर्ड तपासतानाच तो सध्या काय करतो, कुठे रहातो, जवळचे नातेवाईक, मित्र यांची माहिती घेतलीच, शिवाय त्यांचे फोटोही घेऊन कुंडल्या अद्ययावत केल्या आहेत.

Video : पुण्यात एमपीएससी करणारी तरूणी अडकली सीसीटीव्हीच्या जाळ्यात

त्याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगार तपासणीचे काम सुरू आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police Warns criminals Whose name in Crime Record