लोभी माणसांनी भरलेल्या जगात...हे काय घडले

जगन्नाथ माळी
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

संबंधित विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये व एक किलो मिठाईचे बॉक्स देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुकही केले.

उंडाळे ः संस्कार, त्याग, शुद्ध चारित्र्य, नैतिकता, प्रामाणिकपणा सामाजिक भावना समाजातून संपली आहे, अशी चर्चा घडवली जाते. मात्र, सामाजिक भावना जागी ठेवणारी घटना येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयात घडली आहे. रस्त्यावर सापडलेली दोन लाख रुपयांची बॅग मालकाला प्रामाणिकपणे परत करून विद्यार्थी कसा असावा. त्याचे कृतीशील दर्शन विद्यार्थ्यांनी करून दिले आङे. त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 

हेही वाचा : राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

शेवाळवाडी-म्हासोली येथील रयत सहकारी साखर कारखान्याचे बगॅसचे टेंडर येथील मारुतराव शेवाळे यांचे सांगली येथील नातेवाईकांकडे आहे. ठेकेदाराचा कर्मचारी कारखाना बगँस विक्रीचे दोन लाख रुपये बँगेत भरुन घेऊन सांगलीकडे गडबडीने निघाले होते. त्यावेळी पैशांनी भरलेली बॅग बांदेकरवाडी (सवादे) येथे रस्त्यात बांदेकरवाडी येथे रस्त्यात पडली.

आवश्य वाचा ः ...म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा

त्याच वेळी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे बारावीचे विद्यार्थी दीपक रामिष्ठे, रविंद्र मोहिते, सिद्धनाथ मस्कर तेथून परीक्षेतून घरी निघाले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात पडलेली बेवारस बॅग दिसली. त्यांनी बॅग हातात घेऊन पाहिले असता ती बॅग पैशाने भरली होती.

हेही वाचा ः सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेले मंदिर

पैशाने भरलेली बॅग पाहून विद्यार्थ्यांना यातील पैसे घ्यावेत अथवा ती परत देवू नये, असा कोणताही मोह झाला नाही. विद्यार्थ्याने इकडे तिकडे काही न दिसल्याने त्यांनी थेट उंडाळे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार काळे, महिला पोलिस चव्हाण यांच्याकडे ती बॅग सुपूर्त केली. 

बॅगेतील पैशाची मोजणी करून त्यामध्ये असलेल्या पत्त्यावर व मोबाईल नंबर वरुन संबंधित बँग मालकाला फोन करून सांगण्यात आले. संबंधित मालकाने प्रत्यक्ष येवून ती बॅग आपलीच असल्याचे पटवून सांगितले. खात्री करून बॅग मालकास परत केली.

त्यावेळी वीस हजार रुपये या तीन विद्यार्थ्यांना द्यावेत असे पोलिसांना व त्यांचे नातेवाईक मारुतीराव शेवाळे यांना मालकाने सांगितले. त्यावेळी श्री. शेवाळे यांनी संबंधित विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये व एक किलो मिठाईचे बॉक्स देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुकही केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Undale students Returned Two Lacs Rupees Honestly