सांगली महापालिकेच्या महालसीकरणात २२३१० जणांचे लसीकरण

आरोग्य यंत्रणेला यापुढेही लसीकरण सुरू राहणार
सांगली महापालिकेच्या महालसीकरणात २२३१० जणांचे लसीकरण
सांगली महापालिकेच्या महालसीकरणात २२३१० जणांचे लसीकरणsakal

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात महापालिकेने घेतलेल्या दोन दिवसीय महालसीकरण अभियानात २२३१० जणांनी लस घेतली आहे. महापालिका क्षेत्रात ७४ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण होण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला यापुढेही लसीकरण सुरू राहणार असल्याचे सांगितले.

महापालिका क्षेत्रात गेली दोन दिवस महालसीकरण हाती घेण्यात आले होते. नागरिकांचे सुलभतेने लसीकरण व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या दवाखान्यासह १०७ बाह्य सत्राद्वारे २५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट महापालिका आयुक्त कापडणीस आणि टीमने ठेवले होते. याला नागरिकांनी प्रतिसाद देत दोन दिवसात २२३१० नागरिकांनी लस घेत महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

सांगली महापालिकेच्या महालसीकरणात २२३१० जणांचे लसीकरण
अकोला : कपाशी मजुराअभावी होत आहे मातीमोल!; शेतकरी हवालदिल

ता. २१ रोजी ११२१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर आज ११०९२ नागरिकांनी लस घेतली आहे. यामुळे सांगली महापालिका क्षेत्र १०० टक्के लसीकरणाच्या जवळ पोहचले आहे. दोन दिवसीय लसीकरण मोहिमेत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांच्यासह वैद्यकीय टीम आणि आशा वर्कर यांनी सहभाग घेतला.

यापुढेही लसीकरण सुरूच राहणार : आयुक्त कापडणीस महालसीकरण मोहिमेत नागरिकांनी मोठा सहभाग दर्शविला आहे. त्यामुळे आपले महापालिका क्षेत्र लवकरच 100 टक्के लसीकरणाचे उद्धिष्ट पार करेल. यापुढेही महापालिकेचे सर्व आरोग्य केंद्र आणि बाह्यसत्र मोहिमेद्वारे लसीकरण यापुढेही कायम राहणार असून लसी विना राहिलेल्या नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com