esakal | इस्लामपूर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळेंची नियुक्ती!
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळेंची नियुक्ती!

काही महत्वाची वगळता सर्वच कामे रखडली होती. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर होता. मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावरही कोणाचा वचक नव्हता.

इस्लामपूर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळेंची नियुक्ती!

sakal_logo
By
धर्मवीर पाटील,

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेला अखेर मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली. गेली तीन महिने हे पद रिक्त होते. काल रात्री उशिरा इस्लामपूर नगरपालिकेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वैभव साबळे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काल रात्री तसे आदेश जारी केले. मुख्याधिकारी अरविंद माळी यांची १९ जुनला पदोन्नतीने पंढरपूरला बदली झाल्यापासून इस्लामपूर नगरपालिकेत अधिकृत मुख्याधिकारी नव्हते. काही काळ पलूस मुख्याधिकारी तर मध्ये तहसीलदार रविंद्र सबनीस तर सध्या आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे इस्लामपूर नगरपालिकेची जबाबदारी होती.

हेही वाचा: 'योगी आदित्यनाथ मठात गेले अन् मुख्यमंत्री झाले'

काही महत्वाची वगळता सर्वच कामे रखडली होती. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर होता. मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावरही कोणाचा वचक नव्हता. अनेकांची कामे होत नसल्याने शहरातील नागरिक हतबल झाले होते. आज साबळे यांच्या निवडीचे आदेश पालिकेला प्राप्त होताच अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. सिधुदुर्ग येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारण्यापुर्वी साबळे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याबाबत साबळे यांच्याशी संपर्क साधला असता 'सध्या परिक्षेनिमित्ताने मुंबईत आहे, परंतु लवकरात लवकर इस्लामपूर पालिकेचा पदभार स्वीकारु' असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top