#KheloIndia वेटलिफ्टींगमध्ये वैष्णवी पवारला सुवर्ण; मयूरी देवरेला रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

खेलाे इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत वेटलिप्टींग क्रीडा प्रकारात वैष्णवी पवार आणि मयूरी देवरे यांनी सलग दूसरे वर्ष महाराष्ट्राला पदक मिळवून दिले आहे. या दाेन्ही खेळाडू सातारा जिल्ह्यातील आहेत. 

आसाम (गुवाहाटी) : येथे सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी पवारने सुवर्णपदक तसेच मयूरी देवरे हिने रौप्यपदक मिळविले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राची पदक मिळविण्याची घाैडदाैड सुरु राहिली आहे. 

भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम
 
या स्पर्धेतील 17 वर्षाखालील गटात 81 किलो वजन गटात वैष्णवी संतोष पवार हिने 62 स्नॅच, 72 क्लीन ऍन्ड जर्क असे एकूण 134 किलो वजन उचलत प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेतील 21 वर्षाखालील गटात 81 किलो वजन गटात मयुरी रामचंद्र देवरे हिने 105 स्नॅच व क्लीन अन्ड जर्क असे 181 किलो वजन उचलत द्वितीय क्रमांक मिळविला. यशस्वी खेळाडूंचे अनंत इंग्लिश स्कूलचे  मार्गदर्शक जितेंद्र देवकर यांनी अभिनंदन केले.

#KheloIndia : सुदेष्णा,पार्थसह आता स्नेहाची दमदार कामगिरी
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishnavi Pawar Bagged Gold In Weightlifiting Khelo India Youth Games