
सोलापूर : दररोजच्या जेवणात लागणारा भाजीपाला घराच्या टेरेसवर उगवत आहे. सोलापूर येथील निसर्गप्रेमी सरोज बच्चुवार हे काम करत आहेत. बच्चुवार हे घराच्या टेरेसवर अनेक भांड्यांत तसेच वस्तूंमध्ये वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चात होईल असा भाजीपाला पिकवत आहेत.
जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला विषमुक्त भाज्या-फळे मिळावीत म्हणून प्रयत्न करीत आहेत. तसेच खराब झालेल्या बाटल्या आणि बादल्या गोळा करून त्या व्यवस्थित कापून त्यात भाजीपाल्याची लागवड करत आहेत. अशा प्रकारे प्राथमिक तयारी करून टेरेसवरील ठराविक अंतरावर बादल्या आणि सिंटेक्सच्या टाक्यांचे कापलेले तळ ठेवले. त्यामुळे बरीच झाडे तजेलदार आहेत.
सरोज बच्चुवार यांना लहानपणापासून बागेतील काम करायला खूप आवडते. बच्चुवार यांच्या घराच्या 600 स्क्वेअर फूट टेरेसवर व अंगणात बाग आहे. बागेत सर्वच प्रकारची झाडे आहेत. घराच्या टेरेसवर जास्तीत जास्त फळझाडे व भाज्या लावल्या आहेत. भाज्यांमध्ये पालक, चुका, अळू, चिघळ, घोळ, दोडके, तोंडली, वांगी, घोसावळी, कांदा पात, मेथी आदी बऱ्याच भाज्या आहेत.
या भाज्यांना दररोज पाणी देण्याचे सातत्य ठेवले जात आहे. तसेच औषधी वनस्पतीही आहेत. त्याचप्रकारे रोज ग्रीन टीसाठी लागणारी गवती चहा, पुदिना, वेलदोड्याची पाने, तुळस, अद्रकाची पाने, अश्वगंधा, हळदीची पाने, ऑल स्पाईसेसची पाने, दालचिनीची पाने घरातील बागेत आहेत. बच्चुवार हे घरातील बागेसाठी केवळ ऑरगॅनिक खतेच वापरतात. घरामध्येच ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतात. स्वयंपाकासाठी वापरलेल्या कांदा, लसणाच्या सालीचे पाणी कीटकनाशक म्हणून वापरतात. सरोज बच्चुवार त्यांच्या कुटुंबाला विषमुक्त भाज्या फळे मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांच्या टेरेसवर भाजीपाल्यासोबतच अनेक फळांची झाडी लावली आहे. फळांत आंबा, चिकू, पेरू, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट अशा बऱ्याच फळांची झाडे लावली आहेत. प्रत्येकाने आपल्या घरात असेल तितक्या जागेत विषमुक्त भाज्या लावाव्यात. जेणेकरून आपल्या कुटुंबासाठी विषमुक्त भाज्या अन् फळे खाण्यास आरोग्यास फायदेशीर ठरेल, असे निसर्गप्रेमी ऍड. सरोज बच्चुवार यांनी सांगितले.
टाकाऊ वस्तूंचा वापर
बच्चुवार हे झाडांसाठी घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करतात. जसे शॉम्पूच्या बॉटलमध्ये लसूण, पुदिना लावले आहेत. तसेच खराब झालेल्या ओव्हनमध्येही चिघळची भाजी लावली. जरा फुटलेले कप कॅक्टससाठी वापरतात. वापरलेल्या दुधाच्या पिशव्यांत झाडे लावतात. याचपद्धतीने घरातील टेरेसवर अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आयुर्वेदिक ग्रीन टीसाठी शरीरास चांगले असणारे पानेही लावण्यात आली आहेत.
महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.