Accident
AccidentSakal

वाहनांचा वेग बेलगाम, आयुष्याला लगाम!

गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराज्य व पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार झाल्याने वाहनाची वर्दळ वाढली असून वेगही वाढला आहे.
Summary

गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराज्य व पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार झाल्याने वाहनाची वर्दळ वाढली असून वेगही वाढला आहे.

निपाणी - गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराज्य व पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे (Pune Bengaluru National Highyway) काम दर्जेदार झाल्याने वाहनाची (Vehicle) वर्दळ वाढली असून वेगही वाढला आहे. वाहनधारकांचा वेग (Speed) बेलगाम असल्याने चिक्कोडी, हुक्केरी विभागात वर्षात ६१ जणांच्या आयुष्याला (Life) कायमचा लगाम लागला आहे. तर १०३ जण जखमी झाले आहेत. रस्ते अपघात (Accident) या निष्पापांचा बळी (Death) गेल्याच्या घटना निपाणी, खडकलाट चिक्कोडी, संकेश्वर, हुक्केरी पोलिस ठाणे हद्दीत घडल्या आहेत.

निपाणी तालुक्यात पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग तर निपाणी-मुधोळ हा राज्य महामार्ग आहे. दोन्ही रस्त्याचे काम चांगले झाल्याने व वाहनांची रहदारी असल्याने अपघाताचा धोका नागरिकांना बसताना दिसत आहे. व्यायाम, मॉर्निंग वॉकसाठी जाणारे तरुण, वयोवृद्ध नागरिक सकाळी, सायंकाळी रोडच्या बाजूने दिसतात. पण पहाटेच्या गाढ झोपेत व सायंकाळी दारूच्या नशेत असलेली वाहने आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने वेग बेलगाम असतो. याच बेलगाम वेगाने वर्षात ३६ जणांचा बळी घेतला आहे.

निपाणीतील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षात ४० अपघातात १५ जणांना जीव गमवावा लागला. तर २२ जण गंभीर आणि १० किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिस ठाण्याच्या दप्तरी आहे. ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत वर्षभरात २७ अपघात झाले आहेत. १३ जणांना जीव गमवावा लागला तर १६ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद पोलिस ठाण्याच्या दप्तरी आहे.

Accident
एक विवाह ऐसा भीं; तीन फुटाचा वर अन् साडेपाच फुटाची वधू

बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ अपघात झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. खडकलाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ अपघात होऊन ८ जणांचा बळी गेला आहे. तर १६ जण जखमी झाले आहेत. संकेश्वर, हुक्केरी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत ४२ अपघात झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३० जण जखमी झाले आहेत. यासाठी वेगाला मर्यादा घालणे आवश्यक झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिशादर्शक फलक नाहीत. अवघड वळण, अवघड घाट, गतिरोधक नसल्याने व साईड पट्ट्या कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी रस्त्यावर व्यायाम करताना किवा मॉर्निंग वॉक करताना काळजी घ्यावी. पहाटे झोपेची वेळ असते. यावेळी चालकाला डुलकी लागू शकते. ती डुलकी आपले आयुष्य संपवू शकते. रात्री आणि पहाटे वाहने चालवताना चालकांनीही काळजी घ्यावी.

- संगमेश शिवयोगी, मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com