Vidhan Sabha 2019 : तीन कोटींच्या गाड्या, 22 कोटींचे शेअर्स; उमेदवाराचं वय 29!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर : कोल्हापुरात आज, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांसोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञपत्रात त्यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ऋतुराज सध्याच्या घडीला राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवारांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात आज, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांसोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञपत्रात त्यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ऋतुराज सध्याच्या घडीला राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवारांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची संपत्ती आहे तरी किती?

27 लाखांची फोर्ड कार
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे पुतणे व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्याकडे तब्बल 34 कोटी रूपयांची संपत्ती आहे. यात दोन कोटी 62 लाख रूपये किंमतीच्या फोर्शे या परदेशी बनावटीच्या चारचाकी, 27 लाख रूपयांची फोर्ड चारचाकीसह चार लाख एक हजार किंमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. श्री. पाटील यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

एकनाथ खडसे घेणार महत्त्वाचा निर्णय!

घर, जमीन आणि इतर मालमत्ता 11 कोटी
ऋतुराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यासोबत जोडलेल्या विवरण पत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. विविध बॅंका, सहकारी संस्थात ऋतुराज यांच्या नांवे 22 कोटी 88 लाख 58 हजार 140 रूपयांच्या ठेवी, शेअर्स आहेत. त्यांच्या नावे असलेल्या घर, जमीन व इतर मालमतांची किंमत 11 कोटी 47 लाख 7 हजार 297 रूपये आहे. त्यांच्या नावे कसबा बावडा, यड्राव (ता. हातकणंगले), बावेली (ता. गगनबावडा), उजळाईवाडी, केर्ले (ता. करवीर), तळसंदे, अंबप (ता. हातकणंगले) येथे शेतजमीन आहे. कसबा बावडा येथे बिगरशेती जमीनही त्यांच्या नावे आहे. श्री. पाटील हे बावड्यात रहात असले तरी, त्यांच्या नावे पुणे येथील गुलमोहर हौसिंग सोसायटीत 76 लाख 23 हजार रूपये किंमतीचा फ्लॅट आहे.

वाहन आणि तारण कर्ज
ऋतुराज यांच्या नांवे युनियन बॅंकेचे 8 कोटी 80 लाख 68 हजार रूपयांचे तारण कर्ज तर, एचडीएफसी बॅंकेचे 1 कोटी 29 लाख 12 हजार रूपयांचे वाहन कर्ज आहे. याशिवाय त्यांनी ज्ञानशांत ऍग्रो फॉर्मसकडून 5 लाख 30 हजार, आई सौ. वैजयंती यांच्याकडून 20 लाख 21 हजार रूपये, वडील संजय डी. पाटील यांच्याकडून चार कोटी 82 लाख तर इतरांकडून दोन 48 लाख रूपयांचे कर्ज विना तारण स्वरूपात घेतले आहे.

दृष्टीक्षेपात ऋतुराज यांची संपत्ती

  1. वय – 29. विवाहीत. पत्नीचे नांव सौ. पूजा
  2. शिक्षण - बी. बी. ए.
  3. व्यवसाय - शेती, नोकरी, व्यापार
  4. रोकड - 50 हजार
  5. शेअर्स, ठेवीतील रक्कम - 22 कोटी 88 लाख, 58 हजार
  6. घर, जमीन व इतर मालमत्ता - 11 कोटी 47 लाख
  7. सोने - 4 लाख 65 हजार
  8. हिरे - 4 लाख 60 हजार
  9. वाहने - 2 कोटी 93 लाख
  10. बॅंक व व्यक्तींकडील कर्जे - 17 कोटी 65 लाख 20 हजार 548

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 kolhapur south congress leader ruturaj patil property nomination form