esakal | Vidhan Sabha 2019 : महसूलखाते सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 bjp leader chandrakant patil property pune kothrud nomination

चंद्रकांत पाटील यांनी युती सरकारच्या काळात महसूल या महत्त्वाच्या खात्याची धुरा सांभाळली होती. आज, उमेदवारी अर्जासोबत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या संपत्तीचीही माहिती जाहीर केली आहे.

Vidhan Sabha 2019 : महसूलखाते सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज, पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली आहे. चंद्रकांत पाटील यांनी युती सरकारच्या काळात महसूल या महत्त्वाच्या खात्याची धुरा सांभाळली होती. आज, उमेदवारी अर्जासोबत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या संपत्तीचीही माहिती जाहीर केली आहे.

भाजप नेत्याला मिळाली राष्ट्रवादीची उमेदवारी

किती आहे चंद्रकांत पाटील यांची संपत्ती?
चंद्रकांत पाटील यांनी आज, कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच्याजोडीला चंद्रकांत पाटील यांनी प्रतिप पत्र सादर केले आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण 2 कोटी  69 लाख रुपयांची संपत्ती आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिज्ञापज्ञात दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांच्यावर 42 लाख रुपयांचे कर्ज आहे. पाटील यांच्या नावावर 75 लाख 50 हजार रुपयांची मालमत्ता आहे. पण, त्याचवेळई त्यांच्या पत्नीच्या नावे मात्र 1 कोटी 94 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे विवरणपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडे एकूण 2 कोटी 69 लाख 51 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोथरुडमधून पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या विवरणपत्रात पाटील यांनी त्यांच्याकडील मालमत्तेचा तपशील आहे. त्यात 42 लाख 52 हजार 821 रुपयांचे कर्ज घेतल्याचे उल्लेख आहे.

उमेदवाराच्या डिपॉझिटसाठी वृद्धेने विकल्या शेळ्या

चंद्रकांत पाटील यांना विरोध?
चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्याचे. त्यांचे वडील मुंबईत गिरणीकामगार होते. पाटील यांचे शिक्षण आणि जडणघडण मुंबईतच झाली. पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा चंद्रकांत पाटील विधानपरिषदेवर निवडून आले. गेल्या पाच वर्षांत महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. परिणामी चंद्रकांत पाटील यांना स्वतः निवडणूक लढवणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मुंबई किंवा कोल्हापुरातील मतदारसंघाची निवड न करता, पुण्यातील कोथरूड या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली. पण, कोथरूडमध्ये स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार असा मुद्दा चर्चेला आहे. ब्राह्मण महासंघाने प्रसिद्धी पत्रक काढून, चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. तर, दुसरीकडे कोथरूडच्या भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याचीही चर्चा आहे.