esakal | Vidhan Sabha 2019 : विरोधकांकडे साताऱ्यात उमेदवारच नव्हता; पंतप्रधान मोदींचा राष्ट्रवादीला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 pm narendra modi speech satara statement on ncp

साताऱ्यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली.

Vidhan Sabha 2019 : विरोधकांकडे साताऱ्यात उमेदवारच नव्हता; पंतप्रधान मोदींचा राष्ट्रवादीला टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : साताऱ्यात पर्यटन विकासाला सर्वाधिक संधी आहे. त्यामुळे साताऱ्याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. साताऱ्यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली. या दोन्ही उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना केले.

रोहित पवार यांचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

युती सरकारने योजना मार्गी लावल्या
नरेंद्र मोदी म्हणाले, 'जो एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता, तर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. पण, त्यांनी नकार दिला. नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे आले. पण, त्यांना हवेचा अंदाज येतो. त्यामुळं त्यांनीही हे माझे काम नाही, असे स्पष्ट केले. साताऱ्यात यापूर्वी केवळ विकासाच्या नावावर राजकारण झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक योजना रखडवल्या. 2014मध्ये केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप युतीचे सरकार आल्यानंतर या रखडलेल्या योजना मार्गी लागल्या. राज्यातील युती सरकार सिंचनाच्या योजनांवर काम करत आहे. महिला सुरक्षेसाठी सरकार अनेक पावले उचलत आहे.'

कलम 370चा काय संबंध : अजित पवार 

नरेंद्र मोदी म्हणाले...

  1. सातारा-कागल सहापदरीकरणाच्या कामाला वेग येत आहे
  2. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळत आहे.
  3. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे बिल वेळेत मिळण्याचा सरकारचा प्रयत्न
  4. ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध
  5. 60 लाख टन साखर निर्यातीवर सबसिडी देण्याचा निर्णय; ही सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
  6. साखरेबरोबरच इथेनॉल उत्पादनाला प्राधान्या देऊन, साखर उद्योगाला बळ देणार
  7. भविष्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळेल
loading image