
Maharashtra Politics : विधिमंडळाच्या मुख्य लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एकमेकांना जोरदार शिव्या देण्यात आल्या. यामुळे विधीमंडळ परिसरात गोंधळ निर्माण झाला. या प्रकाराचा सर्वपक्षीयांनी निषेध केला. परंतु, जितेंद्र आव्हाड यांचे कायकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करणारा ऋषी ऊर्फ सर्जेराव बबन टकले हा सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.