
वाई (जि. सातारा) : येस बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाचा वाई अर्बन बँकेवर कोणताही परिणाम झालेला नाही अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली आहे.
येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने दि. 5 मार्च रोजी निर्बंध लावलेले आहेत. येस बँकेकडे छोट्या मोठ्या 500 नागरी बँका व काही जिल्हा मध्यवर्ती बँका क्लिअरिंग करिताच्या सबमेंबर बँका आहेत. वाई अर्बन बँकेनेही येस बँकेची फक्त क्लिअरिंगसाठी सबमेंबरशिप घेतली होती. येस बँकेवर निर्बंध आल्यामुळे क्लिअरिंग व्यवस्थेवर काही अंशी परिणाम झाला. त्यामुळे ग्राहकांची चेक क्लिअरिंगबाबत गैरसोय होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आपल्या बँकेने अन्य कमर्शिअल बँकांच्या माध्यमांतून क्लिअरिंगची व्यवस्था केलेली आहे. येस बँकेच्या क्लिअरिंग सबमेंबर बँकांवर रिझर्व्ह बँकेचे कोणतेही निर्बंध नाहीत. लवकरच क्लिअरिंगचे कामकाज व्यवस्थित सुरू होईल. येस बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाचा आपल्या बँकेवर कोणताही परिणाम झालेला नसून बँकेचे सर्व व्यवहार, एनईएफटी, आरटीजीएस फंड ट्रान्सफर सुरळीत चालू आहेत.
याबाबत समाजमाध्यमातून चुकीचे संदेश जात आहेत. जनतेने त्यावर विश्वास न ठेवता रिझर्व्ह बँकेशी अथवा आपल्या बँकेशी संपर्क साधावा. असेही सीए. चंद्रकांत काळे यांनी कळविले आहे.
हेही वाचा : Video : खास तिच्यासाठी गृह राज्यमंत्री थेट शाळेच्या दारात
हेही वाचा : शाळांपुढे कोरोना संबंधी हा यक्ष प्रश्न ?
ज्ञानमंदिराला भेट देणारे शिक्षक कौतुकास पात्र : शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू
वाई : प्रेक्षणीय स्थळे अथवा मंदिरांना भेटी न देता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानमंदिराला भेट देणारे शिक्षक खऱ्या अर्थाने भाग्यवान व कौतुकास पात्र आहेत, असे मत शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
येथील पालिका शाळांमधील शिक्षकांचा अभ्यास दौरा वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित करण्यात आला होता. या भेटीदरम्यान बच्चू कडू यांनी भेट दिली होती. याप्रसंगी शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानला, तर वाबळेवाडी शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सुरुवातीस मोडकळीस आलेल्या दोन खोल्यांत भरणारी शाळा आज साठ गुठ्यांत झिरो एनर्जी क्लासरुमसह दररोज हजारो शिक्षणार्थींना आपली यशो कहानी सांगत आहे. शिक्षकाने मनापासून काम केले, तर माणसातला देव कसा बनतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक दत्ता वारे असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस सतीश वाबळे यांनी सांगितले. यात्रा, जत्रा, देवधर्म यावर खर्च करण्यापेक्षा विद्यामंदिरासाठी योगदान देणाऱ्या ज्ञानतपस्वीला बच्चू कडू यांनी धन्यवाद दिले. शाहू, फुले, आंबेडकरांचे खऱ्या अर्थाने आपण पाईक होण्याचा प्रयत्न करू, या असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याध्यापक श्री. वारे यांनी शाळेसाठी दिलेल्या योगदान ऐकल्यानंतर पालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांमध्ये नवचैतन्य संचारले. या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वितेसाठी प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर, पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्याम पवार, उपाध्यक्ष विलास कोळी, सुरेश दुधाणे, केंद्र समन्वयक विकास जाधव, सर्व संघप्रेमी कार्यकर्ते व मुख्याध्यापकांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.