आम्हाला आधारभूत खरेदी केंद्र पाहिजे 

We need a basic price shopping center
We need a basic price shopping center
Updated on: 

श्रीगोंदे : कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज शंभर टन कापसाची आवक होत आहे. गेल्या महिन्यापासून आवक वाढली असून, आठ दिवसांत यात भर पडली आहे. दरम्यान, येथे कापसाची पन्नास लाखांची उलाढाल होत असली, तरी आधारभूत कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना रोज पाच लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. 

ऊस, कांदा आणि फळबागांचा तालुका म्हणून असणारी श्रीगोंद्याची ओळख आता पांढऱ्या सोन्याने घेतली आहे. यंदा अवकाळी पावसाने फटका दिल्यानंतरही, शेतकऱ्यांनी कष्टाने वाचविलेला कापूस सध्या बाजार समितीत येत आहे. तालुक्‍यातील बहुतेक भागांत शेतकऱ्यांनी कापूस केल्याने त्याचा फायदा आत्ता होत आहे. 

उ​लाढाल पन्नास लाखांच्या घरात 
बाजार समितीत सध्या रोज शंभर टन कापसाची आवक आहे. यातील बहुतेक सगळाच कापूस तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आहे. येथील व्यापाऱ्यांकडून कापसाला चार हजार नऊशे ते पाच हजार क्विंटल दर दिला जात असल्याचे समजले. त्यामुळे रोजच्या कापसाची उलाढाल पन्नास लाखांच्या घरात जाते. महिन्यापासून कापसाची आवक वाढली आहे. सुरवातीला साठ ते सत्तर टन होणारी आवक आता आठवड्यापासून शंभर टनांच्या घरात गेली आहे. 

शेतकऱ्यांना फटका 
दरम्यान, तालुक्‍यात सरकारचे आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्याची आवक पाहता, रोज पाच लाखांचा फटका बसत आहे. मक्‍याचेही आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. कापसाला पाच हजार 255 ते पाच हजार 550 रुपये दर मिळत आहे. 

पत्रव्यवहार केला 
कापूस व मका आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत समितीने अगोदरच पत्रव्यवहार केला आहे. मात्र ते सुरू झालेले नाही. कर्जत येथे ते सुरू होणार होते; मात्र तेथेही झालेले नाही. व्यापाऱ्यांचा हा दर जिल्ह्यातच आहे. 
- संपत शिर्के, अधिकारी, बाजार समिती 

आवक वाढली 
सध्या रोज शंभर टन कापसाची आवक आहे. महिनाभरातील आवक आठवड्यात वाढली आहे. व्यापारी शेतकऱ्यांना रास्त दर देतात. 
- गौरव पोखर्णा, व्यापारी, बाजार समिती 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com