बालारफिकनंतर महाराष्ट्र केसरी कोण ?

Who Is Maharashtra Kesari After Balrafiq
Who Is Maharashtra Kesari After Balrafiq
Updated on

कोल्हापूर - भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीत एकापेक्षा एक सरस मल्ल घडले आहेत. वस्ताद गणपतराव आंदळकर यांच्या करड्या शिस्तीत मल्लांनी सरावात कोणतीच कसूर सोडली नव्हती. त्यांच्या निधनानंतर तालमीची सूत्रे वस्ताद बाळू पाटील - कुडित्रेकर यांच्याकडे आली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लांचा दमदार सराव सुरू असल्यानेच यंदा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात तालमीचे मल्ल विविध वयोगटांत नशीब आजमावणार आहेत. गतवर्षी तालमीचा मल्ल बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी झाला असला तरी यंदा खुल्या गटात तालमीचा एकही मल्ल नसल्याचे दिसत आहे. 

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आंदळकर वस्तादांच्या तालमीत कुस्तीचे डावपेच अंगात रुजविले. सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावण्यात तो कमी पडला नाही. गुडघेदुखीने त्रस्त असतानाही तो तिसऱ्यांदा गदा मिळविण्याच्या प्रयत्नात होता. शरीराने साथ न दिल्याने त्याचे स्वप्न अधुरे राहिले. नंदकुमार आबदारची कारकीर्दही वाखाणण्याजोगी राहिली. त्याने महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनात ९३ किलो गटात सलग दोन वेळा सुवर्ण, ८४ किलो गटात तृतीय क्रमांक पटकावला होता.

खुल्या गटात मोतीबागचा मल्ल नाही

माती विभागातून तो दोनदा महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटात होता. त्याला दोन्ही वेळा महाराष्ट्र केसरीच्या गदेने हुलकावणी दिल्याने उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. बालारफिकने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून तालमीच्या लौकिकात पुन्हा भर घातली. मात्र, याच तालमीचा मल्ल यंदा खुल्या गटात दिसणार नाही. तालमीत मॅट व मातीचा आखाडा आहे. पाण्याची कधी-कधी गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. छोट्या मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविण्याचे ‘टार्गेट’ समोर ठेवून सरावात सातत्य ठेवले आहे. गावोगावच्या मैदानांतून पैशांची तजवीज करण्यालाही ते प्राधान्य देताना दिसतात. त्यातून सरावात खंड पडणार नाही, याची जबाबदारी त्यांनी घेणे आवश्‍यक झाले आहे.   

पन्नासहून अधिक मल्लांचा सराव

तालमीतील कुंडलिक गायकवाड (सुरूल), सचिन खोत (व्हन्नूर) यांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमावले. अजित पाटील (साळवे) अमित चव्हाण (नंदगाव), मारुती जाधव, संदीप सावंत, सर्जेराव सावंत, राजाराम मगदूम यांच्या दमदार सरावाने तालमीत महाराष्ट्र केसरीसह हिंदकेसरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीच्या आशा आहेत. तालमीत ५० मल्ल असून, पाटील-कुडित्रेकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com