का आहे परदेशी पाहुण्यांनाही सोलापूरचे आकर्षण 

प्रशांत देशपांडे 
Saturday, 4 January 2020

वर्षभरात दोन हजार 591 पर्यटक येऊन गेले वर्षभरात शहरातील विविध हॉटेलमध्ये तीन हजारांच्या आसपास विदेशी नागरिक येऊन गेले. यावरून परदेशी पर्यटक आता सोलापूरला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरातील होटगी रोड येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियरमध्ये वर्षभरात दोन हजार 591 तर शिवाजी चौकातील हॉटेल सूर्या येथे वर्षभरात 65 परदेशी नागरिक वास्तव्यास होते. महाराष्ट्रातील नागरिक विविध देशात कामानिमित्त सध्या वास्तव्यास आहेत

सोलापूर : सोलापूर शहर स्मार्ट सिटी होत असताना टेक्‍स्टाईल हब होण्यासाठी शहरात विविध प्रयोग सुरू आहेत. त्याचबरोबर सोलापूरच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विविध राजकीय नेते आणि सामाजिक संस्था पुढाकार घेऊन महोत्सव, स्पर्धांचे आयोजन करत आहेत. यामुळे भारतासह विविध देशांतील खेळाडू सोलापुरातील विविध स्पर्धांत सहभागी होत आहेत. 

हेही अवजुर्न वाचा : भारीच...जुळे सोलापूरकरांनी मानले सकाळचे अभार 
वर्षभरात दोन हजार 591 पर्यटक येऊन गेले 
वर्षभरात शहरातील विविध हॉटेलमध्ये तीन हजारांच्या आसपास विदेशी नागरिक येऊन गेले. यावरून परदेशी पर्यटक आता सोलापूरला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरातील होटगी रोड येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियरमध्ये वर्षभरात दोन हजार 591 तर शिवाजी चौकातील हॉटेल सूर्या येथे वर्षभरात 65 परदेशी नागरिक वास्तव्यास होते. महाराष्ट्रातील नागरिक विविध देशात कामानिमित्त सध्या वास्तव्यास आहेत. 
हेही अवर्जुन वाचा : सोलापूर अध्यक्षपदासाठी मोहिते पाटलांचे ठाकरेंशी झाली होती चर्चा 

धार्मीक पर्यटन व पक्षीनिरीक्षणसाठी येतात नागरिक

भारतात आल्यानंतर शहरातील श्री सिद्धेश्‍वर मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर व कर्नाटकातील गाणगापूरचे श्री दत्त मंदिर, विजयपूर येथील गोलघुमट पाहण्यास पर्यटक येतात. या सर्व ठिकाणी भेट देण्यासाठी त्यांना सोलापूर शहरात यावे लागते. साहजिकच येथील मोठ्या हॉटेलमध्ये ते मुक्कामास असतात. त्याचबरोबर नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य येथे पक्ष्यांचा अभ्यास करण्यास विदेशातून नागरिक सोलापुरात येतात. 
सोलापुरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने विविध कामांसाठी परदेशातून व्यापारी प्रतिनिधी, कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या प्रमाणावर येतात. अलीकडेच व्हायब्रंट टेरी टॉवल एक्‍झिबिशनला अनेक विदेशी व्यापाऱ्यांनी सोलापूरला भेट दिली होती. तर विविध स्पर्धांसाठी व व्यवसायासाठी परदेशातून नागरिक सोलापुरात येतात. गारमेंट या वाढत्या उद्योगातील विविध उत्पादने सततच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे आता जगभरात पोचली आहेत. या उत्पादनांच्या पाहणीसाठी विविध देशांतील व्यापारी, विक्री प्रतिनिधी शहरात येत असतात. त्यांच्या मुक्कामासाठी टू स्टार, थ्री स्टार व फाइव्ह स्टार हॉटेल असल्याने त्यांची चांगली सोय होत आहे. विमानसेवा सुरू झाल्यास त्यात दुपटीने वाढ होण्याची आशा येथील उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. 
सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन केंद्र असल्याने तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर तसेच नान्नज येथील माळढोक अभयारण्य पाहण्यास परदेशातून नागरिक येतात. तसेच सोलापुरात सध्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्माते आणि अभिनेते मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे सोलापुरात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
राम रेड्डी, संचालक, बालाजी सरोवर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Solapur Attractions For Foreign Visitors