संशयाचा कीडा वळवळला अन्‌ पत्नीचा केला कोळसा 

Wife murdered on suspicion of assault
Wife murdered on suspicion of assault

राहाता : चारित्र्याच्या संशयावरून एकरुखे येथील एकाने पत्नीचा खून केला. नंतर मृतदेह पोत्यात भरून, दुचाकीवरून दूरवर नेऊन रस्त्यालगत त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. छाया सुनील लेंडे (वय 32, रा. एकरुखे) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनील जनार्दन लेंडे असे आरोपी पतीचे नाव असून, तो स्वत:हून राहाता पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. 

याबाबत मृत छाया यांचे भाऊ सुनील आप्पासाहेब तरस (वय 33, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, छाया यांचा विवाह 2008मध्ये एकरुखे येथील सुनील लेंडे याच्याशी झाला. त्यांना तीन मुले आहेत. मात्र, चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत असत. त्यातून अनेकदा सुनीलने छाया यांना मारहाणही केली. नातेवाइकांनी त्याला वारंवार समजावून सांगितले होते. 
दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी चार वाजता घास कापण्यासाठी दोघे शेतात गेले होते. छाया घास कापत असतानाच आरोपी सुनीलने त्यांच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने जोरात फटका मारून खून केला. 

मृतदेह शेतात तसाच ठेवून तो घरी गेला. "रुई येथील पाहुणा मृत झाल्याने, तुम्ही मुलांना घेऊन तिकडे जा; मी पाठीमागून येतो,' असे सांगून त्याने घरच्यांना गावी पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास पोते व पेट्रोल घेऊन तो पुन्हा शेतात गेला. मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून एक किलोमीटरवरील नपावाडी रस्ता येथे आग्रे वस्तीजवळ गेला. रस्त्यालगत मृतदेह ठेवून, त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलिसांनी छाया यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. फिर्यादीनुसार आरोपी सुनील याच्याविरुद्ध खून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात छाया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com