नक्‍की वाचाच...अशी होणार 2021 ची जनगणना

census
census
Updated on
सोलापूर : यंदाची जनगणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान केली जाणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेत भारतीय नागरिकत्वाची ओळख म्हणून 'आधार'च्या धर्तीवर स्वतंत्र ओळखपत्रही दिले जाणार असून राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर नोंदणीचा कार्यक्रम देशभर एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत राबविला जाणार आहे. राज्यात 1 मे ते 15 जूनपर्यंत हे काम होणार असून त्यामध्ये जातनिहाय आढावा घेतला जाणार आहे.


हेही वाचाच...ठरलं...कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट !


स्वातंत्र्यानंतरची आठव्या जनगणनेचे नियोजन सुरु झाले असून यशदा प्रशिक्षण केंद्रात राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून 23 डिसेंबरपर्यंत जिल्हे, महापालिकांमधील 137 मास्टर ट्रेनर्सला प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर राज्यातील चार हजार 570 क्षेत्रीय प्रशिक्षकांना जानेवारीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनगणनेची जबाबदारी यंदाही प्राथमिक शिक्षकांच्याच खांद्यावर राहणार असून कमतरता भासल्यास माध्यमिक शिक्षकांचा आधार घेतला जाणार आहे. आता महसुली गावे अन्‌ त्यांच्या बदललेल्या सीमांची माहिती तहसलीदारांमार्फत मागविण्यात आली आहे.
-
'पेपरलेस'साठी टॅब वापरणे बंधनकारक
2021 च्या जनगणनेत प्रथमच टॅब वापरण्यात येणार असून डिजिटल इंडियाच्या धर्तीवर यंदा पेपरलेस जनगणना होणार आहे. केंद्र सरकारकडून टॅब खरेदी करण्यात आले असून प्राथमिक शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही गावांमध्ये नेटवर्कचा अडथळा अथवा टॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मॅन्युअली माहिती भरुन घेण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे. मात्र, टॅब बंद पडल्याचे कारण संबंधितांना स्पष्ट करावे लागणार असून जाणिवपूर्वक टॅबचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचाच...अबब...'यांना' दरमहा 40 लाखांच्या वसुलीचे टार्गेट


तहसिलदारांकडून मागविली माहिती
पेपरलेस जनगणनेसाठी यंदा प्रथमच टॅबचा वापर केला जाणार असून संबंधितांना त्याचे प्रशिक्षण जानेवारीत दिले जाईल. आता नव्या महसुली गावांच्या सीमांची माहिती तहसीलदारांकडून मागविली आहे. जात, व्यवसाय यासह अन्य प्रकाराची माहिती भरुन घेतली जाणार आहे.
- टी. के. मस्के, जिल्हा समन्वयक, जनगणना, सोलापूर


हेही वाचाच...ठरला...सोलापूर विद्यापीठाचा नॅक मूल्यांकनाचा मुहूर्त


ठळक बाबी...
- जनगणनेसाठी टॅब वापरणे प्राथमिक शिक्षकांना बंधनकारक
- जातनिहाय भरुन घेतली जाणार माहिती : तृतीयपंथीयांचीही होणार गणना
- प्राथमिक शिक्षकांच्या खाद्यांवर जनगणनेची जबाबदारी : माध्यमिक शिक्षकांचीही घेणार मदत
- नवी गावे अन्‌ महसुली गावांच्या सीमांची मागविली तहसिलदारांकडून माहिती
- यंदा प्रथमच आधारच्या धर्तीवर मिळणार भारतीय नागरिकत्वाचे ओळखपत्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com