Investment Fraud
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Fraud: जादा परताव्याचे आमिष; महिलेची १३ लाखांची फसवणूक
Fake investment scheme: गुंतवणुकीसाठी धनादेशाने १० लाख रुपये व रोखीने चार लाख रुपये असे एकूण १४ लाख रुपये घेतले. शेअर बाजारात त्याची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर सुरुवातीला चार महिने प्रति महिना २० हजार रुपयांप्रमाणे एकूण ८० हजार रुपयांचा परतावा दिला.
सांगली: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कविता विनोद चव्हाण (वय ४३, रा. भार्गव रेसीडन्सी, वखारभाग, सांगली, सध्या रा.कलानगर) यांनी सांगली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.