सांगलीतील हार्ट ऑफ सिटीत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस सक्तमजुरीची शिक्षा :Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

हार्ट ऑफ सिटीत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस सक्तमजुरीची शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबागमधील स्फूर्ती चौकात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. स्मीता बापुसो पाटील (Smita Patil)(वय ४५, रा. स्फुर्ती चौक) असे त्या महिलेचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे (D.S.Hatrote)यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व्ही. के. मुरचिटे (V.K.Murchite)यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, सांगली शहरात विश्रामबाग हे हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखली जाते. या गजबजलेल्या परिसरात उच्चभ्रूंसह सारेच राहतात. अशा परिसरात गेल्या काही वर्षांपासून स्मीता पाटील ही महिला कुंटणखाना चालवत होती. गरीब, गरजू व अज्ञान मुलींना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पडत होती. याबाबतची गोपनीय माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अनिल तनपुरे यांना मिळाली.

तनपुरे यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देत २८ सप्टेंबर २०१९ रोजी बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. त्यावेळी स्मीता पाटील ही अज्ञान मुलींच्या मार्फत वेश्‍या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले. त्यानुसार त्या महिलेस अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास तनपुरे यांनी केला. अनैतिक मानवी वाहतूक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. साक्षी, पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा: ग्लोइंग स्किनसाठी करा 'वाइन' फेशिअल; वापरा 'या' टिप्स

सरकारपक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. तपास अधिकारी तनपुरे यांच्यासह पीडित महिला, पंच, आणि बोगस ग्राहक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विश्रामबाग ठाण्याचे अंमलदार इम्रान महालकरी, पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, गणेश वाघ यांची सरकार पक्षाला मदत झाली.

loading image
go to top