ट्रेकचा सिलसिला ; सहली दिवसांच्या, पण भरपूर आनंदाच्या !

women together for tour organised for days happy moments in sangli
women together for tour organised for days happy moments in sangli
Updated on

सांगली : आपल्या आजूबाजूला थोडं डोकावलं तर एक दिवसाची सहल होऊ शकेल अशी अनेक ठिकाणं आहेत. आपल्या सोयीनं तिथं सहली आयोजित करता येतील. गेल्या वर्षभरात आम्ही अशा सहली सुरू केल्या आणि आता तो आमचा नित्य उपक्रमच झाला आहे. अनेकजण आमच्या या ग्रुपला येऊन मिळत आहेत. आरोग्यप्रेमींचं तिथं स्वागतच आहे. 

2018 मध्ये सांगलीत 'वॉकेथॉन'च्या निमित्ताने केवळ व्हॉटस्‌ऍपवरून आवाहन केल्याने 700 जण सहभागी झाले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गांवर चालण्याचे कार्यक्रम सुरू झाले. त्यातून मग आम्ही पहिल्यांदा दंडोबाचा ट्रेक ठरवला. तब्बल पन्नासावर चार चाकी व 200 आरोग्य प्रेमींसह आम्ही तो ट्रेक केला. गेल्या जानेवारीत आम्ही सर्वांनी ती धमाल केली. मंदिरात देवाचं दर्शन, हुंदडणे, पतंग उडवणे, सेल्फी अशी सारी मजा केली. नंतर गिरीश मुल्या आणि त्यांच्या टीमने केलेली गरम इडली सांबारचा जाम बेत होता. त्यानंतर अशा ट्रेकचा सिलसिलाच सुरू झाला. 

हातकणंगलेजवळचा रामलिंग अलंप्रभूचा बेत आखला. नेमका त्याच वेळी देवस्थानचा हत्ती तिथे आला होता. त्याच्याबरोबर फोटोसेशन पाठीवर बसणे असे सगळे विविध प्रकार सगळ्यांनी करून या छोटी सहलीचा आनंद घेतला. मधल्या काळात कोरोनामुळे सगळ्यांचं घरातच राहणं आवश्‍यक झालं. यावर मात करून सुटीदिवशी रविवारी पहाटे साडेपाचला बाहेर पडून सांगली जिल्ह्यातली विविध विशेषतः डोंगरावरची भटकंतीला आम्ही सुरवात केली. 

आपल्या सांगली जिल्ह्यात किती तरी पर्यटन करता येणारी स्थळे आहेत याची जाणीव झाली. ही ठिकाणे आपण आरोग्य प्रेमी सभासदांनी पाहिलीच पाहिजेत असा निश्‍चय आम्ही केला. साधारण दोन महिन्यांपूर्वी लॉक डाऊन संपल्यानंतर पहिला कार्यक्रम गिरीलिंग ज्याला जुना पन्हाळा म्हणतात तिथं जाण्याचा केला. पुढील महिन्यात दत्तजयंतीच्या दिवशी पौर्णिमा असल्याने सांगली शहरातच दत्त मंदिरात चांदण्यात चालण्याचा कार्यक्रम केला. बऱ्याच जणांना वाटलं हा आमचा मोर्चाच आहे. भारती दिगडेंनी त्यावेळी सवयीने "आरोग्यासाठी चालत राहा' अशा घोषणा दिल्या. आरती, दुग्धपान झाले आणि एक आगळावेगळा "मूनवॉक' आम्ही एन्जॉय केला. 

गेल्या 26 जानेवारीला आम्ही तासगाव तालुक्‍यातल्या पेडला झेंडावंदन केले. अशा वर्षभरातील सहलींनी आमचं कोरोनातलं वर्षही आनंदात गेले. अर्थात या साऱ्या सहलीचं नियोजन करण्यात श्रीरंग केळकर, संदीप कोकाटे, संजय भिडे, भावना शहा, संजय कट्टी, अनिल कुलकर्णी अशी कितीतरी मंडळी सक्रिय असतात. त्यांच्यामुळंच आमच्या सहली नियोजनपूर्वक पार पडल्या. आमचा हा ग्रुप वाढतोच आहे. जिल्ह्यातील अशा सर्व ठिकाणांना भेटी द्यायचा आमचा निर्धार आहे. तोपर्यंत आमचा ग्रुप किती जणांचा होतोय पाहुयात ! 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com