एसटी वाहकाच्या मृत्यूने संसार उघड्यावर | Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस हिंगोली

सांगली : एसटी वाहकाच्या मृत्यूने संसार उघड्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : एसटीच्या विलीनीकरणासाठी सुरू असलेला संप, तर दुसरीकडे कारवाईची टांगती तलवार यामुळे आलेल्या तणावातून कवलापूर येथील वाहक राजेंद्र पाटील यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी, दोन मुली, चिमुकला मुलगा आणि वृद्ध आईचा सांभाळ करणाऱ्या राजेंद्र यांचा संसारच मोडून पडला. राजेंद्र यांच्या पश्‍चात कुटुंबाची जबाबदारी पत्नीवरच येऊन पडली. एसटी महामंडळाने त्यांना तत्काळ नोकरीत रुजू करून घ्यावे, अशी मागणी आहे.

हेही वाचा: परळीत एसटीचे दहा कर्मचारी निलंबित

सांगली आगारात एसटी वाहक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कवलापूर येथे वृद्ध आई, पत्नी, दोन मुली आणि वर्षाचा चिमुकला मुलगा, असा त्यांचा संसार होता. एसटी वाहक म्हणून मिळणारे वेतन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नव्हते. गावाजवळ एकर शेती आहे. त्यामुळे कशीबशी संसाराची गाडी ते हाकत होते. सुखाचा संसार सुरू होता. तशातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. प्रशासनाने दुसरीकडे निलंबनाची कारवाई सुरू केली. त्यामुळे राजेंद्र यांना कारवाईची धास्ती होती.

तसेच संपाचे पुढे काय होणार? याचीही भीती होती. त्यातच दुर्दैवाने गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. राजेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले. वृद्ध सासू, तीन मुलांना घेऊन संसाराची गाडी पुढे नेण्याची जबाबदारी पत्नी दीपाली यांच्यावर येऊन पडली आहे. एसटीतील सहकारी कर्मचारी आणि गावकऱ्यांनी त्यांना धीर दिला आहे; दीपाली यांना एसटी प्रशासनाने आधार देण्याची गरज आहे. त्या बीएस्सी पदवीधर असून अनुकंपावर नोकरीत सामावून घेण्यासाठी योगीराणा संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा: चिपळूण : पोफळी गटात सेना-राष्ट्रवादीची कडवी झुंज

योगीराणा संस्थेचा पाठपुरावा

विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या योगीराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वप्नजित पाटील आणि भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली पाटील यांनी कवलापूर येथे पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दीपाली पाटील यांना नोकरीत घेण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्याशी, तसेच एसटी प्रशासनाशी चर्चा केली. दीपाली यांना नोकरीत घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

loading image
go to top