पुणे बंगळूर महामार्गावरील अपघातात पुण्यातील युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

तळबीड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदहे कराड येथील शासकीय रुग्णालयात नेला. पोलिस हवालदार हेमंत मुळीक अधिक तपास करीत आहेत.

वहागाव (जि. सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता.कराड) गावचे हद्दीत दुचाकीला पाठीमागून वाहनाची भीषण धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुनिल तरसेनलाल चौधरी (वय.३४ रा.संत तुकाराम नगर,पिंपरी पुणे) हे जागीच ठार झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली गावचे हद्दीतून कराड ते सातारा लेन्थवरून जाणारी दुचाकीस (क्रमांक एम.एच.१४.ई.के.७३९३) पाठीमागून येणाऱ्या वाहनाची भीषण धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. धडकदिल्यानंतर संबंधित वाहन चालक पळून गेला. दरम्यान अपघातग्रस्त वाहनाच्या नंबर प्लेटवर आर्मी असे लिहिल्याने संबंधित व्यक्ती आर्मीत असावी अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

पोलिसांना अपघातमध्ये ठार झालेल्याची ओळख पटली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तळबीड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदहे कराड येथील शासकीय रुग्णालयात नेला. पोलिस हवालदार हेमंत मुळीक अधिक तपास करीत आहेत.

सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल

असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार

उंब्रज ः कोर्टी (ता. कऱ्हाड) येथे भर दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन घरे भस्मसात झाली आहेत. दुर्घटनेत घरे व संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने सहा मुलांसह एक महिला स्फोटातून बचावली.
 
या घटनेने कोर्टी गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दोन घरांशेजारी इतर घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. माणिक जयसिंग भिंगारदेवे व जनार्दन निवृत्ती नांगरे यांची आगीत घरे जळून भस्मसात झाली असून, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत.

याबाबत माहिती अशी ः कोर्टी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रोडलगत माणिक भिंगारदेवे व जनार्दन नांगरे यांची घरे आहेत. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एका घरात अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली. उन्हाचा पारा असल्याने स्फोटानंतर क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. काही मिनिटांत दोन्ही घरे आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीत सुमारे दोन तोळे सोने, रोख रक्कम, तसेच संसारोपयोगी साहित्य असे पाच लाखांवर नुकसान झाले आहे. सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा दोन्ही घरांत मिळून सहा लहान मुले व एक महिला होती. मात्र, सुदैवाने ते बचावले.
 
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जयवंत शुगर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व संपूर्ण आग आटोक्‍यात आणण्यात आली. आगीत दोन कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. माणिक भिंगारदेवे व जनार्दन नांगरे यांची दोन्ही कुटुंबे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या घटनेने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth From Pune Died In Accident On Pune Banglore National Highway