esakal | गावाच्या ओढीने 'त्यांनी' पायी कापले ३०० कि. मी. अंतर
sakal

बोलून बातमी शोधा

youth travelling pandharpur to karwad karnataka corona virus

पंढरपूर येथून पाच दिवसांपूर्वी आपल्या गावाकडे कागवाडमधील शेडबाळ स्टेशन गावामार्गे चालत निघालेल्या या मजुरांना काहीजणांनी अडविले. 
कारवार जिल्ह्यातील हल्याळचे हे ४ तरुण पंढरपूर येथे कामासाठी गेले होते. लॉकडाऊनमुळे कंपनीच्या प्रमुखांनी त्यांना जाण्यास सांगितले.

गावाच्या ओढीने 'त्यांनी' पायी कापले ३०० कि. मी. अंतर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागवाड (बेळगाव) : लॉकडाऊन असले तरी गावी परत जाण्याचा निर्धार कारवार जिल्ह्यातील हल्याळ येथील तरुणांनी केला आहे.  ते पंढरपूरहून तब्बल ३००  किलो मीटर पायी प्रवासासाठी  मार्गस्थ झाले आहेत. शेडबाळ स्टेशन येथे आले असता त्यांची काही जणांनी सोय केली.
 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनचा आदेश देऊन पंधरा दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रात अडकलेले कर्नाटकातील कामगार आडवाटेने चालत कर्नाटकातील गावी जात असल्याचे निदर्शनास आले.

हे पण वाचा -  धक्कादायक : जयसिंगपुरात अधिकाऱ्यालाच बुरशीजन्य उत्पादनाची विक्री 

पंढरपूर येथून पाच दिवसांपूर्वी आपल्या गावाकडे कागवाडमधील शेडबाळ स्टेशन गावामार्गे चालत निघालेल्या या मजुरांना काहीजणांनी अडविले. 
कारवार जिल्ह्यातील हल्याळचे हे ४ तरुण पंढरपूर येथे कामासाठी गेले होते. लॉकडाऊनमुळे कंपनीच्या प्रमुखांनी त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे हे गेले पाच दिवस ३०० किलो मीटर पायी प्रवास करीत मुख्य रस्ता सोडून आडमार्गाने अधिकाऱ्यांना चुकवून मिरजमार्गे आले. मिरजहून शेडबाळ रेल्वे स्टेशनला आले असताना प्रवीण पाटील, पोपट कवटगे, फारुख अलास्कर , विठ्ठल कोळके, कुमार कोळके यांनी त्यांना अडवून अधिकाऱ्यांना माहिती दिली.

हे पण वाचा - सांगली ब्रेकिंग : जिल्ह्यात 26 पैकी 24 कोरोनामुक्त 

कागवाडच्या तहसीलदार प्रमिला देशपांडे, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत शिरहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल निरीक्षक एस. बी. मुल्ला , रेल्वे पोलिस एन. एम. मर्डी,  जी. एम. कट्टीमनी, आरपीएफ अब्दुल हबब, संतोष संगोटे यांच्या पुढाकारातून या तरुणांची व्यवस्था कागवाड येथील वसतिगृहात करण्यात आली.
 

loading image
go to top