'या' घटनेमुळे तरुणाईत संताप

सुस्मिता वडतिले
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  • सोशल मीडियावर हैदराबादमधील घटनेचा निषेध
  • कोपरडी, दिल्लीतील घटनेची आठवण
  • महिलांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
  • बलात्काऱ्यांना शिक्षेची मागणी

सोलापूर : हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या झाल्याने राज्यातील कोपरडी व राजधानी दिल्लीतील "निर्भया' घटनेची आठवण ताजी झाली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून तरुणाईंने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. व्हाट्‌सअप, फेसबुकवर स्टेट्‌स ठेऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याने वाचा फोडत निषेध नोंदवला आहे. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; 169 आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध 

मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कायदे करुनही अशा घटना थांबत नसतील. तर सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेचा उपयोग काय होणार. एखाद्या संविधानमधील कर्मचाऱ्यांच्या मुलींवर ही वेळ येईल, तेव्हा डोळे उघडेल या सरकाराचे. कायदा महिलांचे रक्षण करु शकत नसेल तर प्रत्येकवेळी मेणबत्ती जाळण्यापेक्षा एकदाचा.., मग सर्वांचे डोळे उघडतील. शहरात दरवर्षी रावणाच्या पुतळ्यांचे दहन जाळण्यापेक्षा अशा बलात्कारी रावणांना जाळले तर देश सुधारेल. "रीप' प्रियंका रेड्डी... पुन्हा निर्भया... जस्टीस फॉर प्रियंका रेड्डी... जोपर्यंत या देशाच्या धर्मव्यवस्थेत मूलभूत बदल होणार नाही तोपर्यंत निर्भया होतच राहतील... अजूनही माझा भारत देश महिलांसाठी खरंच सुरक्षित नाही... देश स्वंतत्र झाला, पण मुली नाही... शेम ऑन ह्युमॅनिटी... हा ट्‌विटरवर ट्रेड आहे. 

हेही वाचा : विधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग 

स्त्रिया सुरक्षित आहेत का?
सध्याच्या अशा घटना ऐकता आणि पाहता देशात स्त्रिया सुरक्षित आहेत का असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. एकीकडे बेटी बचाओ चा केला जाणारा नारा आणि दुसरीकडे अशा घटना. यावरुन असे वाटते की देश बदला अथवा ना बदला पण कायदा जरुर बदलला पाहिजे.
- अर्चना गायकवाड

कठोर शिक्षा द्या
आपल्या देशामध्ये बलात्कार प्रकरण संपणार नाही. अशा गुन्हेगारांना सर्वांनी एकवटून भर चौकात गुन्हा सिध्द झाल्यावर जाळायला हवे. तरच अशा समाज विघातक विकृतींना आळा बसले. शिक्षण, संस्कार आणि कठोर कायदा हेच या घटनांना रोखण्याचे प्रभावी उपाय ठरु शकेल.
- अनघा जहागिरदार
-
किती दिवस सहन करायचे
स्त्रियांनी असे अजून किती दिवस सहन करायचे ह्या नराधमांच्या वासनेला बळी पडणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रीवर हात टाकणाऱ्याचे हात तोडून त्याला कडे लोट केले जात होते. मला वाटते की, त्यावेळेच्या शिक्षेची तरतूद आता सुरु करायला हवी.
- श्रीकांत कोरे

कठोर शिक्षा करा
अशा नराधमांना कठोर शिक्ष झाल्याशिवाया ते सुधारणारे नाही. यांच्यावर कठोर शिक्षा केलीच पाहिजे. तरच आपला भारत देश सुधारेल.
- नरेंद्र सुवर्णकार

सारखी सारखी मेणबत्तीच का जाळायची
अशा घटनांवर सारखी सारखी मेणबत्तीच का जाळायची. एकदा बलात्कारी जाळून पाहा किती बलात्कार कमी होतील. सध्याचे वास्तव पाहता माणसात देव शोधले पाहिजे पण आपल्या देशात माणसात फक्त राक्षसच पाहायला मिळत आहे.
- सोमनाथ पटणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth is upset over this incident