सांगलीकरांनी अनुभवला Zero Shadow Day; सावलीने सोडली साथ

सांगलीकरांनी अनुभवला खगोलशास्त्राचा चमत्कार
सांगलीकरांनी अनुभवला Zero Shadow Day; सावलीने सोडली साथ
Updated on

सांगली : सांगलीकरांनी (sangli peopele) आज दुपारी साडेबारा वाजता काही काळ सावलीनेही (zero shadow day) साथ सोडल्याचा अनुभव घेतला. खगोलशास्त्राच्या चमत्कारामुळे ही घटना अनुभवयास मिळाली. काहीशा ढगाळ वातावरणातही सूर्य बरोबर डोक्‍यावर आल्याने म्हणजेच सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळे परिसरातील सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात गायब झाल्या.

आज दुपारी साडेबारा (afternoon) वाजण्याच्या सुमारास सूर्य डोक्‍यावर आल्याने सूर्यकिरण लंबरूप म्हणजे काटकोनात (right angled)पडले. त्यामुळे जमिनीला लंबरूप असलेल्या मनोरे, उंच इमारती, गोपूरे, टॉवर, खांब आदींसह सर्वांच्या सावल्या त्यांच्या पायात पडल्या. त्यामुळे काही काळ त्या नाहीशा झाल्याचा अनुभव आला. आज सकाळपासून (morning atmosphere) ढगाळ वातावरण असल्याने शून्य सावली दिवस दिसणार का याबाबत शंका होती; मात्र बाराच्या सुमारास ढगाळ वातावरणातही सावली गायब झाल्याचे दिसले. त्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला.

सांगलीकरांनी अनुभवला Zero Shadow Day; सावलीने सोडली साथ
जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

या खगोलीय घटनेस "शून्य सावली आविष्कार'' म्हणतात. ही घटना उष्णकटिबंधात घडते. त्याच्या बाहेर कोणत्याही भागात ही घटना घडत नाही. गेली काही वर्षे मे महिन्यात हौशी आबालवृद्ध या घटनेचा आनंद घेत आहेत. काही मिनिटांसाठी का होईना आपली सावली गायब होते हा चमत्कार त्यांना भावतो. त्यासाठी अनेकजण मोकळ्या जागी वस्तू ठेवून त्यांची सावली गायब झाल्याचे पाहतात. तर अनेकजण एकमेकांच्या पायात पाहून त्याची सावली गायब झाल्याचे पाहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gopichand Padalkar
Nipani NH48 flyover wall collapse investigation
Best places to visit in Kadegaon during monsoon
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Marathi News Esakal
www.esakal.com