esakal | बारामतीच्या नवीन वाहतूक आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील; कसा आहे नवीन आराखडा?
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati_Transport

अवजड वाहनांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पुढील प्रमाणे प्रवेश बंद असेल. 

बारामतीच्या नवीन वाहतूक आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील; कसा आहे नवीन आराखडा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : शहराच्या नवीन वाहतूक आराखड्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्यता दिली आहे. या मुळे आता वाहतूकीची नवीन व्यवस्था बारामतीत अस्तित्वात येणार आहे. शहरातील वाहतूकीची कोंडी दूर होऊन नागरिकांना या मुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली असून पार्किंगच्या जागा निश्चित करण्यासह नो पार्किंग झोनही करण्यात आले आहेत. एसटीसह जड वाहनांची वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात येणार असून रिक्षा थांब्याचीही जागा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांनी या वाहतूक आराखड्यास मान्यता दिल्याने आता हा आराखडा अंमलात येणार आहे. बारामती नगरपालिकेने या वाहतूक आराखड्यास ऑक्टोबर 2018 मध्ये मान्यता दिली होती. जिल्हाधिका-यांची मान्यता मिळण्यासाठी याला तब्बल वीस महिन्यांचा कालावधी गेला. 

- 'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय केलाय दावा? वाचा सविस्तर

एकेरी वाहतूक मार्ग -  

गुनवडी चौक ते गांधी चौक, भिगवण चौक ते गांधी चौक, गांधी चौक ते कदम चौक, सुभाष चौक ते तांदुळवाडी वेस.

वाहनतळ -

1. मंडई वाहनतळ- क-हा नदी पूल, गुनवडी चौक ते इंदापूर चौक, एसटी स्टँड, गुनवडी चौक पानगल्ली रोड, म्हाडा कॉलनी, गुनवडी चौक ते महावीर पथ, इंदापूर चौक, सिनेमारोड- व्हीपी इमारत.
2. सिध्देश्वर गल्ली पार्किंग- गालिंदेचौक ते राजस्थान- गांधी चौक व कचेरी रोड (दुकानदार व स्टाफची वाहने समाविष्ट)
3. पाणवठा वेस मारुती मंदीर पार्किंग- गांधी चौक ते कचेरी रोड (दुकानदार व स्टाफची वाहने समाविष्ट)
4. काटे विहीर ते तेली विहीर पार्किंग- सुभाष चौक ते जेबीएस सराफ (दुकानदार व स्टाफची वाहने समाविष्ट)
5. होमगार्ड सभागृह लगत पार्किंग- आर्ट होम ते तांदुळवाडी वेस, दुर्गा टॉकीज (दुकानदार व स्टाफची वाहने समाविष्ट)
6. सांस्कृतिक भवन रोड पार्किंग- भिगवण चौक- जवाहर ब्रदर्स ते मोता रेडीमेड (दुकानदार व स्टाफची वाहने समाविष्ट)
7. स्टेडीयम ते लेंगरेकर पंप पार्किंग रस्ता.
8. मोरोपंत नाट्यगृह लगत पार्किंग प्लॉट नं- 11/1.
9. क-हा नदी पात्र कसबा स्मशानभूमी लगत पार्किंग
10. क-हा नदी पात्र बाह्यवळण रस्ता देवळे इस्टेट मागील बाजू.
11 खंडोबानगर क-हा नदी पात्र- मोरगाव रोडकडून येणारी व खंडोबानगर सिकंदरनगर
12. खंडोबानगर दहन- दफनभूमी लगत क-हा नदी पात्र- बाहेरुन येणारी वाहने.
13. स.नं. 220 लगत क-हा नदी पात्र- कदम चौक ते नगरपालिका आवास योजना- वणवे मळा, दुर्गा पिछाडी.

- सोसायटीत येणारी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील तर नाही ना? सॉफ्टवेअर देणार माहिती

प्रवेश बंद -

अवजड वाहनांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पुढील प्रमाणे प्रवेश बंद असेल. व्यापा-यांची मालवाहतूक करणारी व दुकानात माल उतरविणारी अवजड वाहने, गांधी चौक ते भिगवण चौक, महावीर पथ ते गांधी चौक, गांधी चौक ते कचेरी रोड, गांधी चौक ते तांदुळवाडी वेस चौक.

नो पार्किंग- शारदा प्रांगण, नगरपालिका प्रवेशद्वार लगत, नगरपरिषद उद्योग भवन लगत, तीन हत्ती चौक गुजर कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक भवन स्टेडीयम लगत, एसटी स्टँड दोन्ही गेट लगत, स्टेडीयम पॅव्हेलियनलगत, इंदापूर चौक ते सटवाजीनगर मंडई रस्ता. 

पर्यायी पार्किंग- एशियन पेंटसमोर आमराई, दत्तामंदीरासमोर झगडे गॅरेजकडे जाणारा रोड, श्री महावीर भवन लगत, नीरा कॅनॉल सोसायटी ते स्टेडीयम रस्ता, काटे हॉस्टिपल रोड, स्टेडीयम लेंगरेकर पंप, मंडई पार्किंग- स्टेडीयम लेंगरेकर पंप रोड, सटवाजीनगर- काटे हॉस्पिटल रोड. 

पार्किंग

कोर्ट बिल्डींग ते विद्यानगरी चौक- डावी बाजू- नीरा कॅनॉल लेआऊट, उर्जाभवन लगत, रेस्ट हाऊस लगत, विमलनाथ सोसायटी, रेडीएंट होंडा शोरुममागे गालिंदे ले आऊट, विद्यानगरी चौक ते रुई. 

उजवी बाजू- टीव्हीएस शोरुमलगत, होंडा शोरुमलगत, सुपर गॅसमागे, काळे प्राईड लगत, संघवीनगरलगत, हॉटेल गौरवमागे, संभाजीनगर, सूर्यनगरीसेवा रस्ता. सेवा रस्ता उजवी बाजू- रुई हॉस्पिटल ओपन स्पेस. इंदापूर रोड पार्किंग- डावी बाजू- बागवान लेआऊट ओपन स्पेस, उजवी बाजू- हरिकृपानगर, संघवीपार्क लगत. 

नीरा रोड पार्किंग- डावी बाजू- सोमाणी ह्युंडाईलगत, के.ए.सी. शाळेच्या बाजूने, सुपर गॅसमागे, उजवी बाजू-  ह्युंडाई शोरुमसमोर, म्हसोबा मंदीरासमोर, के.एफ.सी. शाळेसमोर, समीर वर्ल्ड शाळा. 

फलटण रोड- डावी बाजू- महालक्ष्मी शोरुम लगत, तांबे बंगल्यालगत, उजवी बाजू- रेनॉल्ट शोरुमलगत.
मोरगाव रस्ता- डाव्या बाजूला पार्किंगला परवानगी नाही तर उजव्या बाजूला ढवाण पेट्रोलपंप पिछाडीव टोल नाक्या लगत. 
तांदुळवाडी रोड- डाव्या बाजुला- सातव ले आऊट तेर उजव्या बाजूला मिशन ले आऊट. 

रिक्षा थांबे- एसटी स्टॅड, काटे हॉस्टिपल रस्ता, रेल्वे स्टेशन, सांस्कृतिक भवन, इंदापूर चौक, गुनवडी चौक (हॉटेल चैत्राली जवळ), तांदुळवाडी वेस चौक, दुर्गा टॉकीज, कदम चौक, पंचायत समिती कपांऊड लगत, कोर्ट बिल्डींग लगत ओपन स्पेस.जड वाहतूक शहराबाहेरून वळवणे (एमआयडीसीकडे जाणारी वाहने बाह्यवळण रिंग रोडने वळविणे)- मोरगाव रोडकडून येणारी अवजड वाहने मेडद मार्गे मोरेवाडी तांदुळवाडीवरुन एमआयडीसीकडे जातील.
नीरारोडकडून येणारी वाहने शारदानगर मेडदमार्गे मोरेवाडी, तांदुळवाडी एमआयडीसीकडे जातील. पाटस रोडकडून येणारी वाहने उंडवडीहून एमआयडीसीकडे जातील.

इंदापूरकडून येणारी वाहने पिंपळीकडून नियोजीत पालखी मार्गाने एमआयडीसीकडे जातील. रेल्वे उड्डाणपूलवरुन वाहतूकीस अवजड वाहनांना मनाई असेल. बारामती शहर गावठाण रस्त्यावरील दुचाकी वाहने सम विषम तारखांना पार्किंग करणे- डावी बाजू सम तारखा म्हणजे 2, 4, 6, 8 तर विषम तारखा- 1,3,7,9 अशा पध्दतीने-

- कोरोनानंतर आता महाराष्ट्राला सगळ्यांत मोठी संधी; सांगतायत डॉ. अमोल कोल्हे

रस्त्यांचा तपशिल पुढील प्रमाणे-

गुनवडी चौक, महावीर पथ ते गांधी चौक,  गांधी चौक ते तांदुळवाडी वेस मारवाठ पेठ, कचेरी ते भिगवण चौक, गुनवडी चौक ते इंदापूर चौक, गुनवडी चौक ते म्हाडा सर्कल, सुभाष चौक ते तांदुळवाडी वेस, जैन मंदीर ते राम मंदीर रोड, सुभाष चौक- रणसिंग प्रेस, राम गल्ली मुथा हॉस्पिटल ते जेजे हॉस्पिटल रोड, भिगवण रोड सेवा रस्ताते सूर्यनगरी अंतर्गत रस्ता, विद्यानगरी चौक ते गदिमा रस्ता, तांदुळवाडी रस्ता आर.ओ.बी. चौक, मोरगाव रोड खंडोबानगर.

बारामती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या सर्व बस इंदापूर रस्त्याऐवजी काटे हॉस्पिटलमार्गे बाहेर पडतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा