शाळा भरल्या; बाके रिकामीच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

पुणे शहरातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ५२९ शाळांपैकी जवळपास २१४ (४० टक्के) शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. या शाळांमधील सुमारे ४३ हजार ९७१ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीत राहण्यास संमती (पत्र) दर्शविली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ५७.३३ टक्के शाळा सुरू; उपस्थिती केवळ १७ टक्के
पिंपरी - पुणे शहरातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ५२९ शाळांपैकी जवळपास २१४ (४० टक्के) शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. या शाळांमधील सुमारे ४३ हजार ९७१ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीत राहण्यास संमती (पत्र) दर्शविली आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ १३ हजार ३५३ (७.६ टक्के) विद्यार्थी शाळेत हजेरी लावत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात  एकूण पाच लाख ६५ हजार ९२८ विद्यार्थ्यांपैकी एक लाख एक हजार ६३७ विद्यार्थी (१७.९५ टक्के) शाळेत येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू करण्याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ डिसेंबर २०२०मध्ये मान्यता दिली. त्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वतयारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी अशा कामांना सुरुवात केली.

भोसरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेजवळील रस्त्याच्या पदपथावर अतिक्रमण

पिंपरी-चिंचवडमधील ५७.३३ टक्के, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७२.५० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या पालकांच्या संमती पत्रांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, जिल्ह्यात शाळेत प्रत्यक्ष हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्‍केवारी सात ते चोवीस दरम्यान आहे. पुणे शहरात ७.६ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये १६.८९ टक्के, पुणे ग्रामीण २४.३५ टक्के, तर जिल्ह्यात १७.९५ टक्के विद्यार्थी सध्या शाळेमध्ये हजेरी लावत आहेत.

चिखलीत मुख्य चौकामधील भर रस्त्यावर अनधिकृत पथारीवाल्यांचे अतिक्रमण

शाळेमध्ये सगळीकडे सॅनिटायझर ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर ठेवले जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून मुलांना एकत्र येऊ देत नाहीत. शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. त्यामुळे मुलाला शाळेत पाठविणे सुरक्षित वाटत आहे.
- दीपाली अहिरेकर, पालक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School start but student not present