esakal | मावळात आज दिवसभरात १०० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

मावळ तालुक्यात  शनिवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर लोणावळा येथील कोरोनाबाधित ७४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ३९५ तर मृतांची संख्या १४० झाली आहे.  ३ हजार ४४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी ६७ जणांना घरी सोडण्यात आले.

मावळात आज दिवसभरात १०० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात  शनिवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर लोणावळा येथील कोरोनाबाधित ७४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ३९५ तर मृतांची संख्या १४० झाली आहे.  ३ हजार ४४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी ६७ जणांना घरी सोडण्यात आले. 

सिनेमागृह झाले बंद तरी हार मानली नाही! उच्चशिक्षित जोडप्याने शोधला पर्याय

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १०० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ३०, लोणावळा येथील २०, नवलाख उंब्रे येथील १०, वडगाव येथील पाच,  कामशेत व वराळे येथील प्रत्येकी चार, सोमाटणे, सुदवडी व शिवणे येथील प्रत्येकी तीन, इंदोरी व कुसगाव पमा येथील प्रत्येकी दोन, माळवाडी, टाकवे बुद्रुक, कुसगाव बुद्रुक, गहुंजे, शिरगाव, देवले, कांब्रे नामा, चिखलसे, दारूंब्रे, केवरे, कोथुर्णे, गोडूंब्रे, शेवती व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

वीज नसल्याने ऑनलाइन स्टडीचे वाजले बारा; नोकरदारही वैतागले! 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ३९५ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार ५५९ तर ग्रामीण भागातील १ हजार ८३६ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ३३५, लोणावळा येथे ९५८ तर वडगाव येथे रुग्णसंख्या २६६ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ४४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी ६७ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८०६ सक्रिय रुग्ण असून त्यातील ५४० लक्षणे असलेले तर २६६ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५४० जणांमध्ये ४४४ जणांमध्ये सौम्य तर ९३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८०६  जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top