esakal | हिंजवडीत दिवसात १,००० लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

हिंजवडीत दिवसात १,००० लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : आरोग्य उपकेंद्रात ग्रामस्थांसह आयटीयन्सनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यामुळे एकाच दिवशी एक हजाराहून अधिक नागरिकांनी लसीकरण करून ग्रामपंचायतीच्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला.

हेही वाचा: ‘त्या’ बापलेकांसमोर व्हिलनही फिका!

सुरुवातीच्या काळात लसीकरण सुरू झाल्यावर सर्वच आरोग्य केंद्रांत लशीचा पुरवठा कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. परंतु, मंगळवारी (ता. ३१) हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे दत्तवाडी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लशीचे डोस पुरविण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत आणि आरोग्यकेंद्राने ग्रामस्थांना लसीकरणासाठी आवाहन केले होते. त्यास सर्वांनीच मोठा प्रतिसाद दिला. हिंजवडीत गोपाळकाल्याचे औचित्य साधत ग्रामस्थ व आयटीयन्सनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. यावेळी एकूण एक हजार ८९ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. याप्रसंगी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना सुरक्षित अंतर राखत मास्कचा वापर करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत होते.

हेही वाचा: नैराश्यातून बाहेर पडा; चिंता सोडा

सरपंच विक्रम साखरे आणि ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी हिंजवडी गावठाण वाड्यावस्त्यांसह विविध रहिवासी सोसायट्यांतील नागरिकांना लसीकरणसाठी आवाहन केले होते. तसेच, केंद्रावर गर्दीमुळे गोंधळ न होता लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी विशेष सात बूथ उभारले होते. याकरिता ग्रामपंचायत आणि आरोग्य यंत्रणांनी विशेष परिश्रम घेतले. ‘‘पुढील काही दिवस अशाच प्रकारे लसीकरणाची मोहीम सुरू ठेवली जाणार असून, हिंजवडीत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असे सरपंच साखरे यांनी सांगितले.

loading image
go to top