पिंपरी-चिंचवड शहरातील 1122 जणांना आज डिस्चार्ज 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 122 रुग्णांना सोमवारी (ता. 21) डिस्चार्ज मिळाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 122 रुग्णांना सोमवारी (ता. 21) डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 90 झाली आहे. आज 655 जण पॉझिटिव्ह आढळले. आजपर्यंत एकूण 70 हजार 827 जणांना संसर्ग झाला आहे. आज 31 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 11 व शहराबाहेरील 20 रुग्णांचा समावेश आहे. सध्या आठ हजार 584 सक्रिय रुग्ण आहेत. 

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय; सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण आकुर्डी (पुरुष वय 75), भोसरी (पुरुष वय 55, 73, 64), थेरगाव (पुरुष वय 39, 70 व 54), नेहरूनगर (पुरुष वय 63), खराळवाडी (स्त्री वय 35), प्राधिकरण निगडी (पुरुष वय 70), सांगवी (पुरुष वय 65) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान

आज मृत्यू झालेल्या शहराबाहेरील व्यक्ती चाकण (पुरुष वय 61 व 70), कर्वेनगर पुणे (पुरुष वय 73), वडगाव शेरी (स्त्री वय 49), धायरी (पुरुष वय 74), वारजे माळवाडी (स्त्री वय 45, पुरुष 75), खराडी (स्त्री वय 56), आंबेगाव (पुरुष वय 70), खेड (पुरुष वय 89), सोलापूर (पुरुष वय 64), कराड (पुरुष वय 52), जुन्नर (पुरुष वय 75 व 70), हडपसर (पुरुष वय 54), शिंदेवाडी मुळशी (पुरुष वय 45), पुणे (पुरुष वय 40 व स्त्री 50), देहूरोड (पुरुष वय 62) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1122 corona patients discharged in pimpri chinchwad on monday 21 september