पिंपरी-चिंचवड शहरात 113 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 113 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 142 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 855 झाली आहे. सध्या एक हजार 498 सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 113 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 142 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 855 झाली आहे. सध्या एक हजार 498 सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही. 

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पुणे महापालिका काठावर पास 

सध्या रुग्णालयांत 646 रुग्ण उपचार घेत आहेत. 852 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 829 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार 901 जणांची तपासणी केली. 801 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख तीन हजार 265 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत शहरातील एक हजार 789 आणि शहराबाहेरील 749 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज एक हजार 357 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 15 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तीन हजार 248 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 328 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील स्मार्ट सिटी रॅंकिंगमध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला 41 वा क्रमांक

आजपर्यंत पाच लाख 95 हजार 455 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 93 हजार 65 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 91 हजार 692 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 113 new Corona patients in Pimpri Chinchwad city