पिंपरीत 17 जणांच्या मृत्यूची नोंद; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पिंपरीत 17 जणांच्या मृत्यूची नोंद; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात आज 764 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 78 हजार 81 झाली आहे. आज 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 888 झाली आहे. सध्या सहा हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 12 आणि शहराबाहेरील पाच अशा 17 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 318 झाली आहे. 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक भोसरी (पुरुष वय 64 व 38), चिंचवड (पुरुष वय 56 व स्त्री 60), चऱ्होली (पुरुष वय 54 व 77), दिघी (पुरुष वय 50), काळेवाडी (स्त्री वय 50), चिखली (पुरुष वय 51), पिंपरी (पुरुष वय 50), कासारवाडी (पुरुष वय 64), कृष्णानगर (पुरुष वय 58) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक हडपसर (पुरुष वय 68), चाकण (पुरुष वय 63), मुळशी (पुरुष वय 60) सातारा (पुरुष वय 55), हिंजवडी (पुरुष वय 39) येथील रहिवासी आहेत.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आजपर्यंत एक हजार 314 पथकांद्वारे 14 लाख 87 हजार 307 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये एक हजार 120 व्यक्तींच्या घशातील नमुने तपासण्यात आले. त्यातील 235 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com