esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये २१ जणांचा मृत्यू; तर दिवसभरात आढळले अकराशेहून अधिक पेशंट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Dead_Patient

पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी आणि दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

पिंपरी-चिंचवडमध्ये २१ जणांचा मृत्यू; तर दिवसभरात आढळले अकराशेहून अधिक पेशंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग झाल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 21 जणांचा गुरुवारी (ता.20) मृत्यू झाला. त्यात सात महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 736 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 1131 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 38 हजार 821 झाली आहे. गुरुवारी 904 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 770 झाली आहे. सध्या 12 हजार 315 जणांवर उपचार सुरू आहेत.

'पडत्या काळात मंडळ कामाला आलं'; बांधकाम कामगारांनी भावना केल्या व्यक्त

आज मयत झालेल्या व्यक्ती :
निगडी (पुरूष वय ५२), आकुर्डी (पुरूष वय ५४), आकुर्डी (पुरूष वय ५५), चिंचवड (पुरूष वय ३३), चिंचवड (पुरूष वय ६२), मोशी (पुरूष वय ६२), वल्लभनगर (पुरूष वय ६६), चिखली (पुरूष वय ६३), चिखली (पुरूष वय ४५), चिखली (पुरूष वय ६६), मासुळकर कॉलनी (पुरूष वय ७८), कासारवाडी (पुरूष वय ५४), कासारवाडी (पुरूष वय ५५), खेड (पुरूष वय ५४), जुनी सांगवी (स्त्री वय ५४), जुनी सांगवी (स्त्री वय ७३), थेरगाव (स्त्री वय ६०), अजमेरा (स्त्री वय ७३), कल्याण (स्त्री वय ६१), जुन्नर (स्त्री वय ६०), सोमाटणे (स्त्री वय ७२) येथील रहिवासी आहेत.

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी आणि दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top