esakal | 'पडत्या काळात मंडळ कामाला आलं'; बांधकाम कामगारांनी भावना केल्या व्यक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Workers

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मदत करण्यात येत आहे.

'पडत्या काळात मंडळ कामाला आलं'; बांधकाम कामगारांनी भावना केल्या व्यक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे अजूनही काम मिळणे अवघड आहे. होते नव्हते तेवढे सगळे पैसे घरखर्चात संपून गेले. त्यामुळे उसनवारीवर काम सुरू आहे. या बेताच्या प्रसंगात मंडळाकडून आलेल्या पैशामुळे थोडासा हातभार लागला, याचे समाधान बांधकाम मजूर ज्ञानोबा कुंजीर यांना वाटत आहे. कुंजीर हे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ शहरातील विविध बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर काम करत आहेत.

Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी​

पत्नी आणि दोन मुले असलेले कुंजीर यांचे कुटुंब धनकवडी परिसरात राहते. कोरोनामुळे त्यांच्या देखील कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मदत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मंडळाच्या नोंदणीकृत मजुरांना दोन हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार सव्वानऊ लाख मजुरांना सुमारे १८३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या मजुरांच्या खात्यात ही रक्कम पाठवली जात आहे. मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांहून अधिक मजुरांना आत्तापर्यंत पैशाचे वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम कुंजीर यांच्या खात्यात जमा झाली.

सर्वसामान्य नागरिकांच्या बॅंक खात्यांवर 'सायबर धाड'; गुन्ह्यांचा आकडा पाहून व्हाल अवाक!​

याबाबत त्यांनी सांगितले की, "आमच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या मंडळात कोट्यावधी रुपयांचा निधी आहे. कोरोना काळात त्यातील काही भाग आमच्या उपयोगास आला याचा आनंद आहे. मात्र पाच हजार रुपयांमध्ये लॉकडाउनच्या कालावधीत गुजराण करणे सोपे नाही. त्यामुळे मंडळाने प्रत्येक सदस्याला किमान पंधरा हजार रुपयांची मदत करणे आवश्यक आहे. तसेच आमचा विमा देखील उतरवण्यात यावा. अनेक मजूर असे आहेत ज्यांना रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवायला हवी."

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

मजुरांवरील आर्थिक संकट काहीसे दूर करण्यासाठी नोंदणी असलेल्या मजुरांना  यापूर्वीच प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले आहे. त्याअंतर्गत नऊ लाख १५ हजार सभासदांना १८३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या तीन हजारांच्या मदतीसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचे वितरण होणार आहे.
- एस. सी. श्रीरंगम, सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

नोंद घ्यावी असे-
-  राज्यात १२ लाख १८ हजार नोंदणीकृत मजूर
- दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये मदत मिळणार
- मंडळाकडे नऊ हजार कोटी रुपये जमा
- त्यातील ३०० कोटींचे होणार वितरण
- दुसऱ्या मदतीचा आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक सभासदांना लाभ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top