पिंपरी-चिंचवड शहरात आज 217 नवीन रुग्ण; सात रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 217 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 967 झाली आहे. आज 177 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 37 झाली आहे. सध्या दोन हजार 306 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सहा व बाहेरील एक अशा सात रुग्णांचा मृत्यू झाला. काल तेरा जणांचा मृत्यू झाला होता.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 217 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 967 झाली आहे. आज 177 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 37 झाली आहे. सध्या दोन हजार 306 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सहा व बाहेरील एक अशा सात रुग्णांचा मृत्यू झाला. काल तेरा जणांचा मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 624 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 668 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष काळेवाडी (वय 66), रावेत (वय 42), चऱ्होली (वय 55), दिघी (वय 66), दापोडी (वय 70)आणि महिला पिंपरी (वय 75) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष खेड (वय 49) येथील रहिवासी आहे.

दहशत माजविलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुंडांना पायी फिरवलं; निगडी ओटास्कीम गोळीबार प्रकरण

सध्या महापालिका रुग्णालयांत 965 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 341 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 132 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सात हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. 

जांबेत पैशांच्या कारणावरून लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचा खून

कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 289 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 280 जणांची तपासणी करण्यात आली. आज 444 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 69 हजार 522 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 217 new patients Pimpri Chinchwad today Seven patients died