पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! काल दिवसभरात एकही मृत्यू नाही

पिंताबर लोहार
Wednesday, 2 December 2020

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 638 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 671 झाली आहे. शहरातील अन्य रुग्णालयांत यापूर्वी मृत्यू झालेल्या अकरा रुग्णांची माहिती महापालिकेकडे आज प्राप्त झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 220 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 551 झाली आहे. आज 222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 88 हजार 597 झाली आहे. सध्या दोन हजार 334 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील व शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही शहरासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, शहरातील अन्य रुग्णालयांत यापूर्वी मृत्यू झालेल्या अकरा रुग्णांची माहिती महापालिकेकडे आज प्राप्त झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 638 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 671 झाली आहे. शहरातील अन्य रुग्णालयांत यापूर्वी मृत्यू झालेल्या अकरा रुग्णांची माहिती महापालिकेकडे आज प्राप्त झाली आहे. ते शहरातील रुग्ण पुरुष चिंचवड (वय 61), निगडी (वय 69), पिंपरी (वय 60), रहाटणी (वय 63), पिंपळे गुरव (वय 65), संत तुकाराम नगर (वय 90), भोसरी (वय 90) आणि महिला चिंचवड (वय 50), भोसरी (वय 60) येथील रहिवासी आहेत. महापालिकेकडे आज मृत्यू नोंद झालेले शहराबाहेरील पुरुष रासे (वय 86) आणि महिला जुन्नर (वय 75) येथील रहिवासी आहेत. 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

सध्या महापालिका रुग्णालयांत एक हजार 45 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 289 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 133 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सात हजार 54 रुग्ण बरे झाले आहेत. 

कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 376 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 461 जणांची तपासणी करण्यात आली. आज 461 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 70 हजार 828 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 
पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 220 new patients in Pimpri-Chinchwad city