esakal | पिंपरी-चिंचवड शहरात आज 289 पॉझिटीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 289 पॉझिटीव्ह 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 289 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 564 झाली आहे. आज 468 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 289 पॉझिटीव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात आज 289 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 564 झाली आहे. आज 468 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 79 हजार 746 झाली आहे. सध्या तीन हजार 365 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ आणि शहराबाहेरील दोन अशा 10 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 455 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 580 झाली आहे. 

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 54), देहूरोड (वय 66), पिंपळे गुरव (वय 72), दिघी (वय 72). महिला चिखली (वय 53), चिंचवड (वय 68), निगडी (वय 65), सांगवी (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष तळेगाव (वय 30), राजगुरुनगर (वय 55) येथील रहिवासी आहेत. 

कंटेन्मेंट झोनमधील अर्थात पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेल्या भागातील तीन हजार 752 घरांना बुधवारी दिवसभरात भेट देण्यात आली. त्यातील 12 हजार 108 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच, आज 319 जणांचे अलगीकरण करण्यात आले. 

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता