पिंपरी-चिंचवड शहरात 87 नवीन रुग्ण; तर तीन रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 87 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 98 हजार 948 झाली आहे. आज 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 623 झाली आहे. सध्या एक हजार 538 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 87 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 98 हजार 948 झाली आहे. आज 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 623 झाली आहे. सध्या एक हजार 538 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

सध्या रुग्णालयांत 649 रुग्ण उपचार घेत आहेत. 889 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 897 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील तीन हजार 369 जणांची तपासणी केली. 756 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख एक हजार 687 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष पिंपरी (वय 73) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष बालेवाडी (वय 65) व महिला खेड (वय 62) येथील रहिवासी आहेत. आजपर्यंत शहरातील एक हजार 787 आणि शहराबाहेरील 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

आज एक हजार 370 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 69 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दोन हजार 646 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 341 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मीटरप्रमाणे धावणार रिक्षा; शहर पोलिसांचे नियोजन 

आजपर्यंत पाच लाख 92 हजार 317 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 90 हजार 723 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 88 हजार 515 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 87 new corona patients in pimpri chinchwad and three death