कासरवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

कासारवाडी गावठाणातील सर्जा हॉटेलच्यामागील कौलारू घरात शनिवारी (ता. 17) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. तर कुणाल लांडगे तीन पत्ती नावाचा जुगाराचा क्लब चालविताना आढळून आला असून त्यांच्याकडून 36 हजार 660 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पिंपरी : भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई केली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुणाल दशरथ लांडगे (वय 36 रा. कासारवाडी), असे माजी स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे. यासह अप्पाशा इरप्पा शिवशरण (वय 42, रा. शितोळेनगर, सांगवी), शंकर खंडू दुनघव (वय 49, रा. शांतीनगर, भोसरी), किशोर नामदेव बाबर (वय 51, रा. रेल्वेगेटखाली, कासारवाडी), गणेश भीमराव वाघोडे (वय 32, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी), देवराज धोंडिबा पाचंगे (वय 35, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), मुरली शिवाजी उजगरे (वय 51, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​
 

कासारवाडी गावठाणातील सर्जा हॉटेलच्यामागील कौलारू घरात शनिवारी (ता. 17) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. तर कुणाल लांडगे तीन पत्ती नावाचा जुगाराचा क्लब चालविताना आढळून आला असून त्यांच्याकडून 36 हजार 660 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा,  साथीचा रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against seven persons including a former sanctioned corporator in Raid on gambling at Kasarwadi