esakal | वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप

बोलून बातमी शोधा

Action of Municipal Commissioner Rajesh Patil to Rotation of the work of medical officers

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची कार्यवाही; चार जणांमधील कामाचे वाटप 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः शहरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच प्रशासकीय यंत्रणेवर सर्वस्तरातून टीका होत होती. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडील बहुतांश जबाबदारी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यावर सोपविली आहे. साळवे यांच्याकडे आता केवळ समन्वय, पर्यवेक्षक आणि पत्रव्यवहाराची जबाबदारी राहणार आहे. 


रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय विभागाचे निर्णय घेण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी साळवे यांच्यावर होती. मात्र, दीड महिन्यांपासून बेड आणि सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत संताप आहे. त्यामुळेच आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांमधील कामकाजाचे फेरवाटप केले. 

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी
 

नवे कामकाज वाटप असे ः 
- डॉ. पवन साळवे ः महापालिकेच्या सर्व कोविड केअर सेंटरसह ऑटो क्लस्टर, जम्बो हॉस्पिटलचे पर्यवेक्षण 
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कात राहून पत्रव्यवहार व कोविडविषयक कामकाजाचे समन्वय 
- डॉ. लक्ष्मण गोफणे ः वैद्यकीय विभागामार्फत करण्यात येणारे सर्व निविदा विषयक कामकाज, सर्व प्रकारची बिले अदा, खासगी रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन, वायसीएम वगळता वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व रुग्णालये, दवाखान्यांची आस्थापना व संपूर्ण प्रशासकीय कामकाज. वैद्यकीय विभागासाठी मानधनावरील मनुष्यबळ पुरविणे 
- डॉ. वर्षा डांगे ः कोरोना तपासणीच्या प्रमुख, लसीकरण व लसीकरण केंद्रांवर नियंत्रण, शासनाला कोविड विषयक कामकाजाचे अहवाल पाठविणे. 

सातत्याने फेरबदल 
वैद्यकीय विभागाच्या जबाबदारीमध्ये अनेकदा फेरबदल केले आहेत. सुरुवातीला साळवे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यानंतर डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर सोपविली. मात्र, रॉय यांची विभागीय चौकशी सुरू झाल्यानंतर ती गोफणे यांच्यावर सोपविली. त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा काढून घेत साळवे यांच्याकडे दिली. मात्र, साळवे यांच्या कामकाजाबाबत ओरड सुरू झाल्याने पुन्हा गोफणे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. 

पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?

डॉ. रॉय यांची जबाबदारी ‘जैसे थे’ 
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडील सध्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाची सध्या असलेली जबाबदारी तसेच, वॉर रूमच्या समन्वयासह कोविड विषयक सोपविलेली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे..