esakal | पिंपरी-चिंचवड कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी बेडसंख्या

बोलून बातमी शोधा

Oxygen-Bed}

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेने ऑटोक्लस्टर जम्बो रुग्णालयासह पिंपरीतील जिजामाता, वायसीएम व नविन भोसरी रुग्णालय आणि एमआयडीसीतील बालनगरी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करायला सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी बेडसंख्या
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेने ऑटोक्लस्टर जम्बो रुग्णालयासह पिंपरीतील जिजामाता, वायसीएम व नविन भोसरी रुग्णालय आणि एमआयडीसीतील बालनगरी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करायला सुरुवात केली आहे. या सर्व मिळून एक हजार बेड उपलब्ध असून, ७१० रुग्ण आहेत. नवीन भोसरी रुग्णालयात एकही रुग्ण नाही. शिवाय आठशे बेड क्षमतेचे नेहरूनगर जम्बो रुग्णालयाची व्यवस्था तयार आहे. वेळप्रसंगी राज्य सरकारची परवानगी घेऊन तेही सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सद्यःस्थितीत बेडसंख्या पुरेशी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने स्वतःच्या आठ रुग्णालयांसह ऑटोक्लस्टरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात जम्बो रुग्णालय सुरू केले आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएच्या मदतीने नेहरूनगर येथील मगर स्टेडियमच्या जागेत आठशे बेड क्षमतेचे जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाची व्यवस्था केली आहे. सध्या ते बंद आहे. मात्र, तेथील यंत्रणा सज्ज आहे. शिवाय, महापालिकेने २३ कोविड केअर सेंटरही सुरू केले होते. खासगी रुग्णालयांनाही रुग्ण दाखल करून उपचार करण्याची परवानगी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!

मृत्यू रोखण्यास यश
शहरात रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास यश आले आहे. सध्याचा मृत्यू दर ०.१ टक्के आहे. गंभीर व आयसीयूमधील रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना होमआयसोलेटची परवानगी आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज २५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह

बेड क्षमता

  • २०० ऑटोक्लस्टर
  • १०० वायसीएम
  • १०० जिजामाता
  • १०० नवीन भोसरी
  • ४०० बालनगरी

२७०० पैकी २५३ पॉझिटिव्ह
गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली. त्याप्रमाणात तपासण्याही वाढवल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एका रुग्णामागे त्याच्या संपर्कातील १५ ते १७ नागरिकांची तपासणी केली जात आहे. सोमवारी दोन हजार सातशे जणांची तपासणी करण्यात आली, त्यांतील केवळ २५३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

गज्या मारणे टोळीवर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल

लसीकरणासाठी ज्येष्ठांना प्राधान्य
केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला महापालिकेने सोमवारपासून सुरुवात केली. त्याचा प्रारंभ पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात करण्यात आला. साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच, विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय मोहननगर या आठ ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी मोफत लस दिली जाणार आहे. शहरातील इतर ११ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. 

असे होईल लसीकरण
लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या cowin.gov.in या ॲपद्वारे नोंदणी करायची आहे. त्यानुसार, लसीकरण कुठे व कधी होईल, याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतरच लसीकरण केंद्रावर जायचे आहे. लसीच्या दुसऱ्या डोससाठी नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठीची नोंदणी आपोआप होईल, असे महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नागरिकांनी कोविड-१९ चे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करू नये. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा.
- राजेश पाटील, आयुक्त, पालिका

Edited By - Prashant Patil