पिंपरी : मोशी शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली
Admission process of Moshi Government Hostel started pune
Admission process of Moshi Government Hostel started pune sakal
Summary

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली

पिंपरी : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी. वाघमारे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी आहे. शहरात मोफत शिक्षणासाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय मोशी- प्राधिकरणातील ॲक्वार्ड रूग्णालयाजवळ मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात केली जाते.

या वसतीगृहात १०० जणांची प्रवेश मर्यादा आहे. त्यांना प्रवेश मोफत दिले जात आहेत. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, निवासाची सोय, गणवेश, शैक्षणिक साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, जीम, निर्वाह भत्ता, सहल, स्टेशनरी भत्ता आदी सुविधा विनामूल्य पुरविल्या जातात. मात्र, प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील महाविद्यालयात अकरावी, पदविका व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत, शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र जोडावे.

कोणासाठी आहे वसतीगृह

दहावी - बारावी नंतर अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरांमध्ये जातात मात्र घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहणे व आणि जेवणाचा खर्च परवडत नाही, अशा परिस्थितीत मात्र गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत सामाजिक न्याय विभागाचे मोशी- प्राधिकरण येथे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहांमध्ये राहण्यापासून ते शैक्षणिक साहित्य खरेदीपर्यंत शासन मदत करते.

या आहेत सवलती

  • विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा

  • दरमहा निर्वाह भत्ता रक्कम

  • पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम

  • आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर जमा

‘‘शासकीय वसतिगृहात विविध सुविधा देण्यात येतात. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर जमा होते. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी वसतिगृहात येऊन नोंदणी करावी.’’

-एम. डी. वाघमारे, वसतीगृह अधीक्षक मागासवर्गीय शासकीय वसतिगृह, मोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com