esakal | दूध दर आंदोलनात चंद्रकांत पाटील आक्रमक; अजित पवारांवर साधला निशाना
sakal

बोलून बातमी शोधा

An agitation Maval due to no milk price hike by Chandrakant Patil

भारतीय जनता पक्षाच्यावतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. दूध दरवाढी हे आंदोलन झाले, यावेळी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागळताना पाटील बोलत होते.

दूध दर आंदोलनात चंद्रकांत पाटील आक्रमक; अजित पवारांवर साधला निशाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत : ''महाविकास आघाडीच्या सरकारची संवेदनशीलता संपली आहे, या सरकारमध्ये शेतकरीपुत्र असलेल्या मंत्रीमहोदयांना जनतेच्या भावना समजतच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूध धंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पुण्यात या ठिकाणी रुग्णांना मिळतोय दिलासा

भारतीय जनता पक्षाच्यावतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. दूध दरवाढी हे आंदोलन झाले, यावेळी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागळताना पाटील बोलत होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास हे आंदोलन सुरू झाले, या केंद्रावर पाच हजार लिटर दुधाचे संकलन होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, लोणावळच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, नितीन मराठे, अविनाश बवरे, गुलाबराव म्हाळस्कर, दत्तात्रेय शेवाळे, शांताराम कदम आदी उपस्थितीत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

पाटील म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही, कर्जमाफी देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते मिळाली नाही, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाचविण्यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. आता पर्यत केंद्र सरकारने राज्याला मदत केली नाही,'' अशी गरळ ओकणाऱ्या आघाडी सरकारला केंद्राने मोठे अनुदान दिले आहे.

''आतातरी राज्य सरकारने कोरोना हद्दपार करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे, निसर्गचक्री वादळात मावळातील फुल उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पण, अद्याप रुपयाची मदत शेतकऱ्यांना झाली नाही'' असा घणाघात करीत पाटील यांनी सरकारच्या उणीवावर बोट ठेवून सरकारचे वाभाडे काढले. 

कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती